20 वर्षांच्या लोकगायिकेने बॉलिवूडची ऑफर नाकारली; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

20 वर्षांच्या लोकगायिकेने बॉलिवूडची ऑफर नाकारली; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

मैथिली ठाकूर हिची अनेक गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बॉलिवूडमध्ये काम न करण्याच्या निर्णयामुळे तिचं कौतुक केलं जात आहे.

  • Share this:

पाटणा, 11 डिसेंबर : आपल्या सुरेल आवाजामुळे खास ओळख निर्माण केलेली 20 वर्षीय मैथिली ठाकूर सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सध्या तिने घेतलेला एक निर्णय यामागील कारण ठरलं आहे. तिच्या या निर्णयासाठी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मैथिलीने बॉलिवूडमध्ये गाण्याची ऑफर नाकारली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जात आहे.

तिने बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी गाण्यास नकार दिला आहे. तिला लोकगायिका म्हणून पारंपरिक गाणी गाणे पसंत असल्याचे ती सांगते. तिच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे.

ट्विटरवर सुरू आहे चर्चा

ट्विटरवर मैथिली ठाकूरची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी तिने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करीत आहेत. राहुल कुमार नावाच्या एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 20 वर्षांची मैथिली ठाकूरने हिंदू धर्म आणि बॉलिवूडमधील गाण्यातील अश्लील चित्रीकरणामुळे येथे गाणं गाण्यास नकार दिला आहे. ती लोक संगीत आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी गायन सुरू ठेवणार आहे. बॉलिवूडमधून अनेक ऑफर आल्या तरी तिने त्या क्षेत्रात जाण्यास कायम नकारच दिला. आम्हाला तिचा अभिमान आहे.

लेखिका शेफाली वैद्य म्हणाली...

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य म्हणते..मैथिली ठाकूरने घेतलेल्या या निर्णयाचा कौतुक आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी त्यांच्या गाण्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

हे वाचा - 'डर्टी पिक्चर'मधील अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

मैथिली ठाकुर ही बिहारमधील मधुबनी येथील आहे. तिचा जन्म 25 जुलै 2000 साली झाला. आपल्या गाण्याच्या कौशल्यामुळे मैथिली नेहमी चर्चेत असते. ती हिंदी, भोजपुरी, मैथिली आणि अनेक भाषांमध्ये गाते. सोशल मीडिया आणि यूट्यूबवर तिची फॅन फॉलोइंग कोटींमध्ये आहे.

Published by: Priya Lad
First published: December 11, 2020, 8:30 PM IST

ताज्या बातम्या