मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

महिलांना अस्तित्वाची जाणिव करुन देणारी 'Thappad', पाहा तापसीचा दमदार परफॉर्मन्स

महिलांना अस्तित्वाची जाणिव करुन देणारी 'Thappad', पाहा तापसीचा दमदार परफॉर्मन्स

पाहा अंगावर शहारा आणणारा तापसीच्या 'थप्पड' सिनेमाचा ट्रेलर...

पाहा अंगावर शहारा आणणारा तापसीच्या 'थप्पड' सिनेमाचा ट्रेलर...

पाहा अंगावर शहारा आणणारा तापसीच्या 'थप्पड' सिनेमाचा ट्रेलर...

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 31 जानेवारी : तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी सिनेमांमुळे खूप चर्चेत आहे. लवकरच ती मिताली राजच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. मात्र त्याआधी तिचा थप्पड हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

ट्रेलरच्या सुरुवातीला तापसी एक वकीलाच्या समोर बसलेली पाहायला मिळते. जी वकील तिला एक कायदेशीर नोटीस दाखवत घरी परत जाण्यास सांगते. त्यावर तापसी नकार देते. वकील तिला तिची फॅमिली स्टोरी विचारते. घरातले त्रास देतात? नवऱ्याचं अफेअर आहे का? तुझं अफेअर आहे का? या सर्वाचं उत्तर तापसी नाही असं देते. त्यावर वकील म्हणते, फक्त एका थप्पडमुळे? त्यावर तापसी सांगते एक थप्पड पण तो मला असं मारु शकत नाही.

" isDesktop="true" id="432375" >

‘थप्पड’ ही कथा एका अशा मुलीची आहे. जी नवऱ्यानं तिच्या कानशीलात लगावल्यानं त्याला घटस्फोट देऊ पाहते. ही भूमिका तापसीनं साकारली आहे. तिच्या एका निर्णयामुळे तिच्या आयुष्यात काय काय बदल घडतात हे या सिनेमात दाखवलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर शेअर करताना तापसीनं लिहिलं, ‘हां एक थप्पड लेकिन नहीं मार सकता’

मुल्क आणि आर्टिकल 15 सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी थप्पडचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाची निर्मिती टी-सीरिज आणि बनारस मीडिया वर्क्स यांनी केली आहे. तापसीसोबतच या सिनेमात रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 28 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

First published:

Tags: Bollywood