S M L
Football World Cup 2018

ठाणे सीडीआरप्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला समन्स

नवाजुद्दीन शेखनं त्याच्या पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर डिटेल्स मागितले असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे ठाणे सीडीआर प्रकरणाचं आता बॉलिवूड कनेक्शन देखील उघड झालंय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 9, 2018 08:39 PM IST

ठाणे सीडीआरप्रकरणी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला समन्स

09 मार्च : बातमी आहे आपल्या हटके अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवाजुद्दीन शेखची. मात्र ही बातमी त्याच्या चित्रपटाशी निगडीत नाही आहे. तर सीडीआर प्रकरणी चक्क नवाजुद्दीन शेखला ठाणे पोलिसांनी समन्स बजावलंय. नवाजुद्दीन शेखनं त्याच्या पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर डिटेल्स मागितले असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे ठाणे सीडीआर प्रकरणाचं आता बॉलिवूड कनेक्शन देखील उघड झालंय.

दरम्यान सीडीआर प्रकरणी देशातल्या पहिला महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 10 जणांना अटक झालीय. चौकशी दरम्यान आणखी कुणाकुणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान नवाजुद्दीनशी या प्रकरणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं बोलण्यास नकार दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2018 08:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close