Home /News /entertainment /

BEAST:रिलीजपूर्वीच थालापती विजयच्या सिनेमाला मोठा फटका, 'या' देशात बीस्टवर बंदी

BEAST:रिलीजपूर्वीच थालापती विजयच्या सिनेमाला मोठा फटका, 'या' देशात बीस्टवर बंदी

साऊथ सुपरस्टार (South Superstar) अभिनेता थालापथी विजय (Thalapathy Vijay) सध्या त्याच्या आगामी 'बीस्ट' (Beast) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच त्याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 एप्रिल- साऊथ सुपरस्टार   (South Superstar)  अभिनेता थालापथी विजय   (Thalapathy Vijay)  सध्या त्याच्या आगामी 'बीस्ट'   (Beast)  चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच त्याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवरही ट्रेंड करू लागला आहे. दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला मोठा झटका बसला आहे. कुवैतमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटात इस्लामिक दहशतवादाची दृश्ये दाखवण्यात आली आहेत, जी कुवैतच्या हिताच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुवैत सरकारने चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विजयचा 'बीस्ट' हा चित्रपट 13 एप्रिल रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, कुवैतमध्ये लावण्यात आलेल्या बॅनमुळे तिथले लोक चित्रपट पाहू शकणार नाहीत. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटावरील या बंदीचे कारण दहशतवाद असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्समध्ये पाकिस्तानचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्विटमध्ये, दुलकर सलमानच्या 'कुरूप' आणि विष्णू विशालच्या 'एफआयआर'वरही कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली असल्याचंही बोललं जात आहे. रमेश बाला यांनी एक ट्विट केलं असून त्यात लिहिलंय की, 'कुवैतमध्ये माहिती मंत्रालयाने बीस्टवर बंदी घातली आहे. याचे कारण पाकिस्तान, दहशतवाद किंवा हिंसाचाराचे चित्रण असू शकते. अलीकडेच कुरूप आणि एफआयआर या चित्रपटावरही कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली होती. इतर देशांच्या तुलनेत कुवैत सेन्सॉर GCC मध्ये अतिशय कठोर वृत्तीचा अवलंब करत आहे'. 'बीस्ट' चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी रिलीज झाला होता. थालापथी विजयचे चाहते या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक आहेत. यामध्ये विजय दहशतवादाविरुद्ध लढताना दिसणार आहेत. हा चित्रपट मॉर्टेज थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये विजय रॉ ऑफिसर वीरा राघवनची भूमिका साकारत आहे. याचे दिग्दर्शन आणि निर्मिती सन पिक्चर्स करत आहे. यामध्ये विजय अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South indian actor, Upcoming movie

    पुढील बातम्या