News18 Lokmat

संजय राऊत यांच्या 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच

बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा टिझर मोठ्या दिमाखात लाँच झाला. अमिताभ बच्चन आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लाँच झाला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 09:25 PM IST

संजय राऊत यांच्या 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच

21 डिसेंबर :  बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर मोठ्या दिमाखात लाँच झाला. अमिताभ बच्चन आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लाँच झाला. १९९३च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवरील 'ठाकरे' सिनेमाचा टीझर  लाँच करण्यात आला. या सिनेमातून शिवसेना मनसेची अनोखी युती पाहायला मिळतेय. सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते संजय राऊत करतायत, तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे करत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे. मार्च 2018पासून सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. 23 जानेवारी 2019ला बाळासाहेबांच्या जन्मदिनी सिनेमा रिलीज करण्याचा मानस आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.

या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दिन सिद्दिकीने बरीच मेहनत घेतल्याचं या फर्स्ट लुक फोटोवरून दिसतंय. शिवसेनाप्रमुखांच्या वेशभूषत नवाजूद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या देहबोलीची शैली या फोटोमध्ये आपल्याला पहायला मिळतेय. सफेद कुर्त्यामध्ये गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, डोळ्यांवरील चष्मा, डोक्यावरील केसांची स्टाईल, हातांची लकब हे सर्वकाही बाळासाहेबांसारखंच पाहायला मिळतंय. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा कसलेला अभिनेता आहे. त्यांनाही बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी मेहनत घेतल्याचं फोटोमध्ये दिसतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 08:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...