मुंबई, 06 ऑक्टोबर : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृहांची दार उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारनेही सिनेमागृह सुरू करण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे.
सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सिनेमागृह सुरू करण्याबद्दल संकेत दिले आहे.
केंद्र सरकारने मार्च महिन्यापासून बंद असलेले सिनेमागृह आता अखेर उघडण्यात येणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, 'सिनेमागृह सुरू करण्याबाबत केंद्राने निर्णय घेतला आहे. याचा विचार महाराष्ट्र सरकार गांभीर्याने करत आहे. आमची सिनेमागृह मालकांशी चर्चा झाली आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपटांसाठी आणि नाट्यगृहासाठी मौसम असतो. त्यामुळे परवानगी द्यावी ही विनंती केली आहे. त्यांच्या मागणीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. लवकरच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ'
रोहित शर्मा आहे या बॉलिवूड अभिनेत्रीचा 'क्रश', मुंबईतील उद्योपतीशी करणार लग्न
'कोविड रुग्ण संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. त्यामुळे शिथिलता देण्याआधी विचार करू मग निर्णय घेण्यात येईल. सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यातून त्यांना बाहेर काढणे गरजेचं आहे. पुढील काही दिवसांत याबद्दल चित्र स्पष्ट होईल', असंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं.
राज्यात ग्रंथालय आणि इतर गोष्टी थोड्या फार काळात सुरू होतील अशी मान्यता आहे. त्याची तपशील काही दिवसांत स्पष्ट होईल. पुस्तक घरी घेऊन कोणी जाणार असेल तर विचार करता येईल. पूर्णपणे ग्रंथालय,कोचिंग क्लासेस हे कधी सुरू करत येईल हे येणाऱ्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असंही देशमुख यांनी सांगितले.
पुणे हादरलं, नवले पुलाजवळ विचित्र अपघाताचा पहिला VIDEO
दरम्यान, 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. सिनेमागृहाच्या एकूण प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के लोकांना एकावेळी सिनेमा पाहता येणार आहे. दरम्यान याकरता केंद्र सरकारकडून सिनेमांच्या प्रदर्शनासाठी एसओपी (Standard Operating Procedure) जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार काही कडक नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे1. सिनेमागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा अधिक प्रेक्षकांना परवानगी नसावी2. थिएटरमध्ये बसताना योग्य फिजिकल डिस्टंन्सिंग3. 'येथे बसू नये' असे सीट्सवर मार्क करणे आवश्यक4. हँडवॉश आणि सॅनिटायझर पुरवण्यात यावे5. मोबाइलमध्ये आरोग्य सेतू App असणे गरजेचे6. थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक. केवळ लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल7. स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण आणि कोणत्याही आजार असल्यास त्याबाबत अहवाल देणे8. वेगवेगळ्या स्क्रीनसाठी वेगवेगळ्या वेळा असणे आवश्यक9. पेमेंट करताना डिजिटल पद्धतींना प्रोत्साहन10. बॉक्स ऑफिस आणि इतर भागात नियमित स्वच्छता, डिसइन्फेक्शन करावे11. बॉक्स ऑफिसवर आवश्यक काऊंटर उघडली जावी12. मध्यांतराच्या वेळी प्रेक्षकांनी गर्दी टाळावी13. सोशल डिस्टंन्सिंगसाठी बॉक्स ऑफिसमध्ये जागोजागी मार्किंग केले जावे14. तिकिट खरेदी पूर्ण दिवस सुरू असावी, गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकिट बुकिंगची सेवा द्यावी15. थुंकण्यास सक्त मनाई16. खोकताना, शिंकताना खबरदारी घेणे गरजेचे17. पॅकेज्ड फूड आणि पेयं घेण्यास परवानगी, सिनेमागृहामध्ये फूड डिलीव्हरीला परवानगी नाही18. खाण्यासाठी मल्टिपल काऊंटर उपलब्ध असावेत19. सिनेमागृहातील स्टाफसाठी आवश्यक सुरक्षा असणे गरजेचे. उदा. ग्लोव्ह्ज, मास्क, पीपीई इ.20. कॉन्टॅक्ट ट्रॅकिंगसाठी मोबाइल नंबर देणे आवश्यक21. बॉक्स ऑफिसवर आवश्यक काऊंटर असणे गरजेचे22. कोव्हिड-19 संदर्भातील अनियंत्रित वर्तन कठोरपणे हाताळले जावे23. हॉलमधील एसीचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस असावे24. सिनेमा सुरू होण्याआधी, मध्यांतरावेळी आणि सिनेमां संपल्यावर मास्क घालण्याबाबत, फिजिकल डिस्टंसिंगबाबत आणि हायजिनबाबत घोषणा केली जावी.25. पार्किंगच्या ठिकाणी आणि सिनेमागृहाबाहेर गर्दी योग्य पद्धतीने हाताळली जावी26. Do's and Don'ts सिनेमागृहाच्या आवारात विविध ठिकाणी लावण्यात यावेत27. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आल्यास परिसरात डिसइन्फेक्शन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक28. याठिकाणी कर्मचारी 'हाय रिस्क'वर असल्याने, त्यांचा थेट लोकांशी संपर्क टाळावा
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.