Home /News /entertainment /

Bigg Boss 15 च्या जंगलात झाली भयंकर 'दंगल'! अनेक सदस्य जखमी, पाहा VIRAL VIDEO

Bigg Boss 15 च्या जंगलात झाली भयंकर 'दंगल'! अनेक सदस्य जखमी, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : टिव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करीत आहे. शोमधील कंटेस्टट्न्सची पर्सनॅलिटी आता समोर येत आहे. प्रेक्षकांनी अनेकदा कंटेस्टंट्न्सना एकमेकांसोबत वाद घालताना पाहिलं आहे. आता या शोमध्ये आणखी भयंकर प्रकार पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’ने कंटेस्टेंट्सची वागणूक पाहत त्यांना आखाड्यात उतरवलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कंटेस्टन्ट्स एकमेकांसोबत मारामारी करीत आहे. सर्वजण एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलं तर आहेच मात्र मुलीदेखील यात कमी नाही. या दंगलमध्ये अनेक सदस्य जखमी देखील झाले आहेत. आता ही दंगल कुठपर्यंत थांबणार..(Terrible riot in the forest of Bigg Boss 15 Several members injured watch VIRAL VIDEO) हे ही वाचा-Big Boss 15 : मायशा अय्यर, ईशान सेहगलची किसींगची बरसात; दोघं दिसले एकाच चादरीत हा व्हिडीओ कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टा अकाउंटवरुन शेअर केला आहे. जो अडीच लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आज बीबी 15 च्या जंगलमध्ये आमचे सदस्य उतरणार..पाहा बिग बॉस आज रात्री 10.30 वाजता फक्त कलर्सवर. प्रेक्षक हा व्हिडीओ वूटवरदेखील पाहू शकता.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  व्हिडीओमध्ये करण कुंद्रा इतर कंटेस्टन्टवर भारी पडताना दिसत आहे. एका युजरने व्हिडीओवर कमेंट केली आहे की, हा सीजन वेगळ्याच लेवलवर पोहोचला आहे. हा दुसऱ्याच आठवड्यात 11 आणि 13 व्या सीजनचा रेकॉर्ड तोडणारा आहे. तर दुसऱ्या युजरने सांगितलं की, बिग बॉसमध्ये WWE. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. बिग बॉस 15 चा हा दुसरा आठवडा आहे. पहिल्या आठवड्यात मॉडल आणि अभिनेता साहिल श्रॉफ (Sahil Shroff) याला कमी मतं मिळाल्यामुळे शो सोडून जावं लागलं होतं.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg Boss OTT, Social media, Video viral

  पुढील बातम्या