'तेरे बिना'मध्ये सलमानची ऑनस्क्रीन मुलगी साकारणारी 'ती' बालकलाकार आहे तरी कोण?

'तेरे बिना'मध्ये सलमानची ऑनस्क्रीन मुलगी साकारणारी 'ती' बालकलाकार आहे तरी कोण?

'तेरे बिना' गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्यात सलमानच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणारी ती बालकलाकार प्रचंड चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : बॉलिवूडचा भाईजान सलमाननं लॉकडाऊनमध्येही प्रेक्षकांचं मनोरंजन सुरूच ठेवलं आहे. सलमाननं नुकतंच त्याचं दुसरं गाणं 'तेरे बिना' त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन रिलीज केले. या गाण्याची रिलीजच्या आधी खूप चर्चा झाली कारण हे गाणं सलमानच्या पनवेल फार्म हाभसवर शूट करण्यात आलं होतं. त्यामुळे हे गाणं पाहण्यासाठी सर्वच आतुर होते. मात्र गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्यात सलमानच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणारी ती बालकलाकार प्रचंड चर्चेत आली आहे. गाणं रिलीज झाल्यापासून ती बालकार नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा आहे.

सलमानचं अल्बम साँग तेरे बिना नुकतंच रिलीज झालं. या गाण्यात सलमान आणि जॅकलीन यांची ऑनस्क्रीन रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. अवघ्या काही वेळातच हे गाणं हिट सुद्धा झालं. पण यात गाण्याच्या अगदी शेवटी एक लहान मुलगी सुद्धा दिसली होती. त्यामुळे ही मुलगी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर ही मुलगी आहे सियैना रॉबीशन. बॉलिवूड डॉट कॉमनं दिलेल्या वृतानुसार सियैना ही सलमानची चांगली मैत्रीण आणि अभिनेत्री वलुचा डिसूझा हिची लहान मुलगी आहे.

अभिनेत्रीनं केला पोल डान्स, BOLD VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

'तेरे बिना' हे रोमँटिक साँग सलमान खाननं स्वतः गायलं असून या गाण्यात सलमान आणि जॅकलिनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण गाणं सलमानच्या पनवेल फार्म हाऊस आणि आसपासच्या परिसरात शूट करण्यात आलं आहे. या गाण्यातली दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

गाण्याच्या रिलीज अगोदर दिलेल्या एका मुलाखतीत सलमाननं सांगितलं होतं की, हे गाणं त्याच्या एका मित्रानं लिहिलं आहे. पण हे गाणं कोणत्याही सिनेमात फिट बसत नव्हत त्यामुळे सलमाननं हे गाणं आता शूट करून रिलीज करण्याचा प्लान बनवला. सलमाननं सांगितलं की इथे उपलब्ध असेलेलं सामान आणि नॅचरल लाइटमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं असून शूटिंगसाठी त्यांना 4 दिवस लागले.

Lockdwon: 'नागिन 4' फेम अभिनेत्रीचं लग्न रखडलं, आता सतावतेय घराच्या EMI ची चिंता

First published: May 13, 2020, 8:48 AM IST

ताज्या बातम्या