बॉलिवूड गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्री आहेत सैनिकांच्या लेकी!

यातील एका अभिनेत्रीच्या वडीलांना काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवून त्यांची हत्या केली होती.

  • Share this:

प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय या अभिनेत्री सध्या बॉलिवूड गाजवत आहे. या ठिकाणी कोणीही गॉडफादर नसताना त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. पण फार कमी लोकांना माहित आहे की या अभिनेत्री सैनिकांच्या लेकी आहेत.

ऐश्वर्या राय बच्चनचे वडील कृष्णराज राय हे लष्करात बायोलॉजिस्ट होते. कृष्णराज घरात फार शिस्तीचे होते. ऐश्वर्या आणि तिच्या भावाला घरात सर्व कामं ठरवून दिलेल्या पद्धतीनेच करावी लागायची. ऐश्वर्याचा भाऊ आदित्यही मर्चंट नेव्हीमध्ये इंजीनिअर आहे.

प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा आणि आई मधू चोप्रा यांनीही लष्कराची सेवा केली आहे. दोघंही सेनेच फिजिशियन होते. २०१३ मध्ये डॉ. अशोक यांचा मृत्यू झाला.

अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्माही सेनेत कर्नल पदावरून निवृत्त झाले आहेत. अनुष्काचा मोठा भाऊ करनेश शर्मानेही मर्चंट नेव्हीमध्ये काम केलं आहे.

गुल पनागचे वडील एचएस पनाग हे लष्करात लेफ्टनंट जनरल होते. २००८ मध्ये ते निवृत्त झाले.

प्रिती झिंटाचे वडील दुर्गानंद झिंटाही लष्करात होते. प्रिती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला.

लारा दत्ताचे वडील एलके दत्ताही भारतीय वायुदलात विंग कमांडर होते. तर नेहा धुपियाचे वडील भारतीय नौसेनेत कमांडर होते.

सेलिना जेटलीचे वडील वीके जेटलीही कर्नर होते. याशिवाय चित्रांगदा सिंगचे वडील निरंजन सिंग यांनीही लष्कराची सेवा केली आहे. ते भारतीय लष्करात कर्नर होते.

अभिनेत्री निमरत कौरचे वडील भारतीय सेनेत ऑफिसर होते. १९९४ मध्ये काही दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवून त्यांची हत्या केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 02:54 PM IST

ताज्या बातम्या