मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /करण जोहरच्या 'Liger' चित्रपटात झळकणार विजय देवराकोंडा; फर्स्ट लुक प्रदर्शित

करण जोहरच्या 'Liger' चित्रपटात झळकणार विजय देवराकोंडा; फर्स्ट लुक प्रदर्शित

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan johar) यांनी 'Liger saala crossbreed' या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात तेलगू अभिनेता (telugu actor) विजय देवराकोंडा (Vijay deverakonda) आणि अनन्या पांडे मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 जानेवारी: अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड सारख्या अप्रतिम चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात जागा निर्माण करणारा विजय देवराकोंडा (Vijay deverakonda) आता बॉलीवूडच्या (Bollywood) एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar)  त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात तेलगू अभिनेता विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे (Ananya pandey) मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

चित्रपट निर्माता करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुकही प्रसिद्ध केला आहे. या चित्रपटाच नाव 'Liger: साला क्रॉसब्रीड' असं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करणार असून या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनची असणार आहे. त्यामुळे धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली आणखी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याची तयारी करत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(वाचा - सैफ अली खान स्टारर वेब सीरीज 'तांडव' विरोधात FIR दाखल;गंभीर आरोपांसह बॅनची मागणी)

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

'Liger: साला क्रॉसब्रीड'

करण जोहरने या चित्रपटाचा फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टरमध्ये विजय देवराकोंडा एका फायटरच्या भुमिकेत दिसत आहे. त्यानं हातात बॉक्सिंगचे ग्लोव्ह्जही घातले आहेत. तसेच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील रागीट दिसत आहेत. पोस्टरमध्ये विजयच्या पाठीमागे सिंह आणि वाघाचा अर्धा फोटो आहे. Liger म्हणजे मिश्र जातीचा सिंह. जो नर सिंह आणि मादी वाघीनीच्या संभोगातून जन्म घेतो. त्यामुळे या चित्रपटाच्या नावा प्रमाणे विजयची भुमिकाही अशीच काहीशी धमाकेदार असणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

चित्रपट 5 भाषांत होणार प्रदर्शित

या चित्रपटात विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे सोबतच रोनित रॉय, विशु रेड्डी, मकरंद देशपांडे, राम्या कृष्णन आदी कलाकार दिसणार आहेत. करण जोहरने आपल्या पोस्टरमध्ये हा चित्रपट एकूण पाच भाषांत प्रदर्शित केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना भाषेचा अडथळा येणार नाही. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली असून, या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

First published:

Tags: Bollywood, Karan Johar