'महाभारत'च्या संपूर्ण स्टारकास्ट मिळायचं एवढं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही

'महाभारत'च्या संपूर्ण स्टारकास्ट मिळायचं एवढं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही

'महाभारत'च्या स्टार कास्टला मिळणाऱ्या मानधनाची रक्कम ऐकल्यावर अनेकांना त्यावर विश्वासच बसणार नाही कारण...

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. ज्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झालेला दिसून आला. टीव्हीवर सुरू असलेले सर्व शो बंद पडल्यामुळे रामायण आणि महाभारत या लोकप्रिय शोच रि-टेलिकास्ट करण्यात आलं. मात्र नव्या पीढीसाठी यातील अनेक गोष्टी नव्या आहेत. ज्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी एका सीनचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत भीष्म पितामहांच्या मागे कुलरसारखं काहीतरी दिसत असल्याचं काहींनी म्हटलं होतं यावरून वाद झाले होते. यासोबत दुसऱ्या पक्षानं हे पीलरचं डिझाइन असल्याचं म्हटलं होतं.

महाभारत मालिकेतील अनेक गोष्टी सध्याच्या पीढीला आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. जसं की त्यावेळी या मालिकेच्या स्टार कास्टला मिळणार मानधन. या शोच्या संपूर्ण स्टार कास्टला त्यावेळी एका एपिसोडसाठी केवळ 3000 रुपये मानधन मिळत असे. या शोमध्ये काम करणारे जवळपास सर्वच कलाकार हे नवे असल्यानं त्यांची सॅलरी सुद्धा सारखीच ठरवण्यात आली होती. असा दावा टेलिचक्करनं त्यांच्या एक वृत्तात केला आहे.

महाभारतच्या स्टार कास्टला मिळणाऱ्या मानधनाची रक्कम ऐकून अनेकांना धक्का बसू शकतो कारण सध्याच्या काळात सुपरस्टारची रोजची कमाई लाखो-करोडोंच्या घरात आहे. अगदी नवे कलाकार सुद्धा लाखो रुपयांचं मानधन घेतात. पण त्यावेळी 3000 रुपये खूप मोठी रक्कम होती कारण रुपयांचं मूल्य खूप जास्त होतं.

महाभारचे एकूण 94 एपिसोड शूट करण्यात आले होते. त्यामुळे सहाजिकच कोणत्याही कलाकारानं प्रत्येक एपिसोडमध्ये काम केलेलं नाही. अनेक कलाकार तर असे होते. ज्यांचं संपूर्ण शोचं मानधन एक लाख रुपयांपेक्षा कमी होतं. जर एखाद्या कलाकारानं जास्तीत जास्त एपिसोडमध्ये काम केलं असेल तर त्याला सुद्धा 3 लाख रुपयांपेक्षा कमी मानधन मिळालं असेल.

'फक्त यासाठी करिश्माने माझ्याशी लग्न केलं' - संजय कपूरचा धक्कादायक आरोप

तसं पाहायला गेलं तर महाभारताची स्टार कास्ट खूप तगडी होती. या शोमध्ये काम केलेल्या पुनित इस्सार सारख्या कलाकारांनी त्याआधीच इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं होतं. तर मुकेश खन्ना सारख्या कलाकारांनी या शोनंतर इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा जमवला होता.

(संपादन- मेघा जेठे.)

लॉकडाऊनमध्ये खासदार नुसरत जहाँचा TikTok वर धुमाकूळ, डान्सचा VIDEO VIRAL

VIDEO : 'चलती है क्या 9 से 12' वर सलमान जॅकलिनला डान्स स्टेप शिकवतो तेव्हा...

First published: April 25, 2020, 11:28 AM IST

ताज्या बातम्या