KBC 12: त्याने एका चुकीमुळे गमवले 6 लाख रुपये, तुम्हाला उत्तर माहितेय का?

KBC 12: त्याने एका चुकीमुळे गमवले 6 लाख रुपये, तुम्हाला उत्तर माहितेय का?

रामकिशन काबरा 6 लाख 40 हजारांच्या प्रश्नावर चुकीचे उत्तर देऊन खेळातून बाहेर पडले. रामकिशन आणि त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर असून कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाइनवर कार्यरत आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : केबीसी 12 (KBC 12) मधील रोलओव्हर स्पर्धक जय धोंडेने 3 लाख 20 हजार जिंकल्यानंतर तो गेममधून आउट झाला. त्याचवेळी, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट फेरी जिंकून, महाराष्ट्रातील रामकिशन काबरा हे अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर आले. शोमधील आपल्या आधीच्या स्पर्धकाप्रमाणे रामकिशननेही केवळ 3 लाख 20 हजार जिंकले. रामकिशन काबरा 6 लाख 40 हजारांच्या प्रश्नावर चुकीचे उत्तर देऊन खेळातून बाहेर पडले. रामकिशन आणि त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर असून कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाइनवर कार्यरत आहेत.

रामकिशन काबरा यांना केबीसीमध्ये विचारले गेलेले प्रश्न -

- प्रचलित विधानानुसार, ज्या ठिकाणी खूप गडबड घोटाळा आहे त्याबद्दल सांगताना यापैकी कोणते शब्द वापरले जाऊ शकतात?

या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - अंधेर शहर

- शरीराच्या अंतर्गत इजा बऱ्या करण्यासाठी दुधामध्ये यापैकी काय मिसळले जाते, जो एक लोकप्रिय घरगुती उपाय देखील आहे?

या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - हळद

- ही धून कोणत्या चित्रपट मालिकेची आहे? या प्रश्नादरम्यान एक ऑडिओ क्लिप ऐकवली गेली.

या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - धूम

- क्रिकेटमध्ये स्ट्राइकवरील असणाऱ्या फलंदाजाच्या सर्वात जवळ कोणती फिल्डिंग पोझिशन असते?

रामकिशन या प्रश्नावर अडकले आणि त्यांनी व्हिडिओ कॉल अ फ्रेंड लाइफ लाईनचा उपयोग केला आणि त्यानंतर या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - सिली पॉईंट

- जर तुम्ही एक सहस्त्रात एक शतक, एक दशक आणि एक वर्षाला जोडले तर ते एकूण किती वर्षे पूर्ण करतील?

या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - 1111

- आपल्या मोठ्या आवाजामुळे ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्याला ओळखा? या प्रश्नात पक्ष्याचे चित्र दाखवले गेले.

रामकिशन या प्रश्नावर अडकले आणि त्यांनी 50-50 लाईफलाईन वापरली. त्यानंतर, या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - पॅटर्रिज

- राज्य व राजधानीचे शहर असणाऱ्या या जोड्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - राजस्थान-जोधपूर

- या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या पाकिस्तानी क्रिकेटरचा आवाज ऐकू येत आहे तो कोणत्या राजकीय पक्षाचा संस्थापक आहे?

या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ

- यूएसएसमध्ये आणीबाणीच्या वापरासाठी अधिकृत असणारी कोव्हिड 19 च्या उपचारासाठी चाचणी घेतलेले Remdesivir या नावाचे औषध कोणत्या कंपनीने विकसित केले आहे?

रामकिशन या प्रश्नावर अडकले आणि फ्लिप दी क्वेश्चन लाईफलाईन वापरली. अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर गिलियड सायन्सेस सांगितले.

- भागवत देवीचे तपस्वी भगवान राम यांनी वनवासात रावणाशी लढाईची अपेक्षा करताना सीतेला कोणत्या देव किंवा देवीकडे वारसा म्हणून दिले होता? लाइफ लाइन नंतर आलेला प्रश्न हा होता

या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले - अग्निदेव

- या चित्रात भारताकडून एक महत्त्वपूर्ण कागदपत्रांवर सही करताना कोण दिसत आहेत?

या प्रश्नावर रामकिशन अडकले आणि त्यांनी 'आस्क दी एक्स्पर्ट' ही आपली शेवटची लाइफ लाइन वापरली.

यानंतर, या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले - जेएस अरोरा

- 2019 मध्ये रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून निवड झालेल्या या पहिल्या भारतीय महिला वैज्ञानिकांना ओळखा?

या प्रश्नाला रामकिशनने चुकीचे उत्तर दिले व ते खेळातून बाद झाले. यानंतर अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचे अचूक उत्तर सांगितलं - गगनदीप कांग

यासह रामकिशन 3 लाख 20 हजार रुपये जिंकून घरी गेले.

Published by: Karishma Bhurke
First published: October 23, 2020, 12:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या