Home /News /entertainment /

'द कपिल शर्मा शो'ला Vulgar म्हणाले मुकेशजी,'महाभारत' कलाकारांमध्ये वादाची ठिणगी

'द कपिल शर्मा शो'ला Vulgar म्हणाले मुकेशजी,'महाभारत' कलाकारांमध्ये वादाची ठिणगी

मुकेश खन्ना यांनी शोला Vulgar म्हणत, शोमधील पात्र महिलांचे कपडे घालून निकृष्ट्य कृत्य करत असल्याचं ते म्हणाले. मुकेश खन्ना यांच्या प्रतिक्रियेनंतर 'महाभारत'मध्ये 'युधिष्ठिर'ची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान यांनी तिखट प्रत्युत्तर देत नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 6 ऑक्टोबर : नुकतंच 'महाभारत'ची संपूर्ण टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहचली होती. परंतु 'भीष्म पितामह' यांची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी शोमध्ये भाग घेतला नव्हता. त्यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'महाभारत'च्या टीमसह भाग का घेतला नाही, याबाबत सोशल मीडियावर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात येत होते. ज्यावर प्रतिक्रिया देत मुकेश खन्ना यांनी एकामागून एक ट्विट करत, कपिल शर्मा शोवर अनेक गोष्टी लिहिल्या आणि शोमध्ये न जाण्याचं कारणही सांगितलं. मुकेश खन्ना यांनी शोला Vulgar म्हणत, शोमधील पात्र महिलांचे कपडे घालून निकृष्ट्य कृत्य करत असल्याचं ते म्हणाले. मुकेश खन्ना यांच्या प्रतिक्रियेनंतर 'महाभारत'मध्ये 'युधिष्ठिर'ची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान यांनी तिखट प्रत्युत्तर देत नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना टीमच्या रियूनियनमध्ये सामिल होऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांना कदाचित वाईट वाटत असेल, म्हणूनच ते असं बोलले असल्याचंही गजेंद्र चौहान म्हणाले.
  View this post on Instagram

  #mahabharat in #tkss #thekapilsharmashow this weekend 🙏

  A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

  'दैनिक भास्कर'शी बोलताना गजेंद्र चौहान यांनी सांगितलं की, मुकेशजी यांना आता द्राक्ष आंबट लागत आहेत, कारण त्यांना ही द्राक्ष खायला मिळाली नाही. हा शो पहिल्या क्रमांकावर असून लाखो लोक हा शो पाहतात, परंतु मुकेशजी शोला वल्गर म्हणतायेत. शोमध्ये पुरुष महिलांचे कपडे घालतात. परंतु 'महाभारता'तही 'अर्जुन'ने एका महिलेच्या रुपात कपडे परिधान केले होते आणि एका दृश्यात नृत्यदेखील केलं होतं, हे मुकेशजी विसरले का? त्यांनीही शो सोडायला हवा होता? त्यावेळी मुकेशजींनी महाभारत का नाही सोडलं? असा सवाल करत गजेंद्र यांनी मुकेशजींच्या या वागण्याचा तीव्र निषेध करत असल्याचं सांगितलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या