मुंबई 1 मे : देशातील कोरोनाची स्थिती (corona pandemic) अत्यंत वाईट असताना रोजच नव्या घटना समोर येत आहेत. प्रत्येक ठिकाणी कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीच्या वडिलांच कोरोनाने निधन झालं आहे. सोशल मीडिया वर पोस्ट शेअर करत तिने दु:ख व्यक्त केलं आहे.
मराठी तसेच हिंदीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघच्या (Sneha Wagh) वडिलांचे करोनामुळे निधन (death by corona) झाले आहे. तिने सोशल मीडियावरील पोस्ट मार्फत ही माहिती दिली. पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे, ‘न्यूमोनिया आणि कोरोना या आजारांशी महिनाभर झुंज दिल्यानंतर माझ्या वडिलांचे निधन झाले. धक्क्याने आमचं सगळ्याचंच हृदय तुटलं आहे. आमचा सगळ्यात मोठा आधारस्तंभच आम्ही गमावला आहे.’
View this post on Instagram
पुढे स्नेहा म्हणते, (Sneha wrote post) ‘अशा या प्रकारच्या वेदना यापूर्वी कधीही अनुभवल्या नव्हत्या. आपण कोणत्या परिस्थितीमधून जात आहोत याचा फरक पडत नाही. पण आपल्या पालकांना गमावल्यावर प्रचंड वेदना होतात.’ अशाप्रकारे स्नेहाने तिचं दु:ख व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
स्नेहाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती हिंदी टेलिव्हिझन वर फारच जास्त दिसत आहे. मराठीत तिने ‘अधुरी एक कहानी’ (Adhuri Ek Kahani), ‘काटा रुते कुणाला’ (Kata Rute Konala) या लोकप्रिय मालिकांत तिने काम केलं आहे.
‘वारंवार कोरोना चाचण्या करुन मी वैतागले’; राधिका आपटेनं सांगितला लॉकडाऊनमधील शूटिंगचा अनुभव
‘ज्योती’ (Jyoti ) या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिझनवर पदार्पण केलं होत. त्यानंतर ‘एक वीर की अरदास- वीरा’, ‘शेर ए पंजाब : महाराजा रणजीत सिंग’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘कहात हनुमान जय श्रीराम’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Television