मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'चित्रपटात किसिंग सीन करणार नाही...!' नेहाचं बोल्ड दृश्यांवर निर्भीड भाष्य

'चित्रपटात किसिंग सीन करणार नाही...!' नेहाचं बोल्ड दृश्यांवर निर्भीड भाष्य

'न्यूड सिन करायला तयार आहे पण ....', नेहाने पेंडसेने तिच्या भूमिकांविषयी स्पष्ट आणि निर्भीड मत मांडलं आहे.

'न्यूड सिन करायला तयार आहे पण ....', नेहाने पेंडसेने तिच्या भूमिकांविषयी स्पष्ट आणि निर्भीड मत मांडलं आहे.

'न्यूड सिन करायला तयार आहे पण ....', नेहाने पेंडसेने तिच्या भूमिकांविषयी स्पष्ट आणि निर्भीड मत मांडलं आहे.

मुंबई, 1 मे : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) आता हिंदी टेलिव्हिजन वरही आपली जादू दाखवत आहे. तिच्या अभिनय शैलीने तसेच सौंदर्याने नेहमीच तिने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. नेहाने नेहमीच वेगळ्या थाटनीच्या भूमिका स्वीकारल्या आहेत. तर यावेळी तिने न्यूड आणि बोल्ड सीन्स (nude and bold scene) वर भाष्य केलं आहे.

नेहा एका मुलाखतीत तिच्या भूमिकांविषयी स्पष्ट मत मांडलं आहे. ती म्हणते, “मी पूर्णपणे प्रेमावर आधारीत सिनेमांत काम करु इच्छिते मात्र किसिंग सीन्सवर आधारित चित्रपटांमध्ये काम करणार नाही.”  पुढे नेहा म्हणाली, “मी कधीही अशा चित्रपटांचा किंवा आशयाचा भाग होणार नाही. अशा प्रकारे बरेच चांगले बोल्ड सीन आहेत. ज्यांना निर्मात्यांनी त्यांना चांगल्याप्रकारे हाताळलं आहे. आपल्याला अशा सीनला पाहून वाईट देखील वाटत नाही. मी बोल्ड सीन आणि न्यूडसीनच्या विरूद्ध नाही मात्र ही दृष्टिकोनाची बाब आहे आणि मी चांगल्या कामासाठी तयार आहे.”

View this post on Instagram

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

यानंतर नेहाने न्युड सिन वरही आपलं मत मांडलं. ती म्हणाली, “जेव्हा मी एक विशिष्ठ वयात होते तेव्हा मला असं वाटायचं की, त्या चित्रपटात किस सीन नाही किंवा न्यूड सीन नाही तर तो चित्रपट चालणार नाही, मात्र आता मला वाटतं की, जर माझ्याकडे टॅलेंट आहे तर मी माझ्या अभिनयाद्वारे हे दाखवू शकतो.” त्यामुळे नेहा ने तिच्या भूमिकांविषयी परखड मत मांडलं आहे.

मराठी मालिका गाजवल्या, आता हिंदीतही देणार टक्कर; 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींची धूम

‘भाभीजी घर पर है’ (Bhabhiji Ghar Par Hai) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिकेत सध्या नेहा काम करत आहे. त्यात ती अनिता भाभीची भूमिका साकारत आहे. मागील वर्षीच नेहाचं लग्न झालं आहे. शार्दूल सिंग बयास याच्याशी तिने विवाह केला आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment