सोज्वळ दिसणाऱ्या दया भाभीचा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

सोज्वळ दिसणाऱ्या दया भाभीचा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

मालिकेत सोज्वळ तसेच भारतीय संस्कारांनी परिपूर्ण अशी तिची भूमिका गेले कित्येक वर्षे प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. त्यामुळे दिशाचा हा अवतार पाहून चाहते चांगलेच चकित झाले आहेत

  • Share this:

मुंबई 22 एप्रिल : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta ka oolta chashma)  मधील दया बेन (Daya ben) म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानीचा (Disha Wakani)  एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. तर दयाचा हा अंदाज पाहून चाहते ही अवाक् झाले आहेत. दिशाने स्वत:च हा फोटो शेअर केला आहे. आणि त्यानंतर तिला अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

मालिकेत सोज्वळ तसेच भारतीय संस्कारांनी परिपूर्ण अशी तिची भूमिका गेले कित्येक वर्षे प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. त्यामुळे दिशाचा हा अवतार पाहून चाहते चांगलेच चकीत झाले आहेत. या व्हिडिओत तिने फेस ऍपच्या (apps)  माध्यमातून स्वत:चा चेहरा एडीट केला आहे. हे हॉलिवूड चित्रपटातील गाण असून हार्ली क्वीन या पात्रावर तिने स्वत:चा चेहरा लावला आहे. पण दिशाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे. व हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपासून दया म्हणजेच दिशा ही मालिकेत दिसत नाही. अनेकदा तिच्या मालिकेत परतण्याच्या बातम्या आल्या पण अद्याप ती परतेली नाही. तर पुन्हा एकदा मालिकेचे निर्माते असिदकुमार मोदी यांनी मागील आठवड्यातच दिशा परतणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे यावेळी तरी दिशा परतणार का पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 2017 साली दिशा गर्भवती असल्याने तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता पण त्यानंतर ती परतलीच नाही. तर प्रेक्षक दयाची मालिकेत आतूरतेने वाट पाहत आहेत.

हे वाचा - अमिताभ बच्चन यांनी राजकारणात येण्यास दिला होता नकार, सोनिया गांधीना उद्देशून दिलं होतं हे उत्तर...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला आता 12 वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. इतकी वर्षे मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर मधल्या काळात काही कलाकारांनी मालिकाही सोडली व नव्या कलाकांची एन्ट्री झाली आहे.

Published by: News Digital
First published: April 22, 2021, 10:47 PM IST

ताज्या बातम्या