Home /News /entertainment /

टेलिव्हिजनचा ‘हा’ फिट अभिनेता आधी होता 95 किलो; जुना PHOTO सोशल मीडियावर

टेलिव्हिजनचा ‘हा’ फिट अभिनेता आधी होता 95 किलो; जुना PHOTO सोशल मीडियावर

हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख (Shaheer Shaikh) ने स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे. एके काळी शाहीर हा 95 किलो वजनाचा होता.

  मुंबई, 11 एप्रिल : अनेकदा अभिनेते अभिनेत्री एखाद्या रोलसाठी वजन कमी किंवा जास्त करतात. तर काहींनी आपल्या वजनात लक्षणीय बदल केला आहे. हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख (Shaheer Shaikh)  ने स्वत:ला पूर्णपणे बदललं आहे. एके काळी शाहीर हा 95 किलो वजनाचा होता. पण आता मात्र तो अतिशय फिट आहे. शाहीरने त्याचा जुना फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाहीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagaram post) त्याचा हा जुना अनेक वर्षापूर्वीचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तो चक्क 95 kg असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांनी तसंच अनेक त्याच्या सहकलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे शाहीर स्वत:मध्ये बदल घडवण्यासाठी फारच मेहनत घेतली असल्याचं काही चाहते म्हणाले.
  शाहीर हिंदी टेलिव्हीजनचा प्रसिद्ध चेहरा असून अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. त्याच्या मालिका या प्रचंड लोकप्रिय देखील झाल्या होत्या. 2009 साली ‘क्या मस्त लाइफ है’ (Kya mast life hai) या मालिकेतील लहानशा पात्रापसून त्याने करिअरला सुरुवात केली होती. ‘महाभारत’ (Mahabharat) मालिकेतील त्याचं ‘अर्जुन’ हे पात्र प्रेक्षकांना विशेष भावलं होतं. त्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

  (वाचा - अखेर एकता कपूरच्या Alt बालाजीने हटवलं समलैंगिक सीरिजचं पोस्टर)

  भारतासोबतच देशाबाहेरही शाहीरची चांगली लोकप्रियता आहे. त्याने काही इंडोनेशियन (Indonesian film) चित्रपटांतही काम केलं आहे. तसंच त्याच्या अनेक मालिका इंडोनेशियात पाहील्या जातात. सलिम अनारकली (Saleem Anarkali), कूच रंग प्यार के ऐसे भी (kuch rang pyar ke aise bhi), झांसी की राणी (Jhansi ki rani), ये रिश्ते है प्यार के (ye rishte hai pyar ke) अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने काम केल आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Television

  पुढील बातम्या