Home /News /entertainment /

पळून पळून किती पळणार?; अभिनेत्याला मालदीवच्या रिसॉर्टमध्ये कोरोनानं गाठलं

पळून पळून किती पळणार?; अभिनेत्याला मालदीवच्या रिसॉर्टमध्ये कोरोनानं गाठलं

"व्हायरस खरा आहे आणि तो जगभर पसरत आहे...." मालदीव मध्येच कोरोनाची लगान झालेला अभिनेता नमिश ने चाहत्यांना आवादन केलं आहे.

  मुंबई, 20 एप्रिल :  देशभरात कोरोना रुग्णसंख्या (corona patients) वाढत आहे. त्याचबरोबर बॉलिवूड (Bollywood) आणि टिव्ही विश्वातही (TV industry) कोरोनाने थैमाण घातलं आहे. अनेक अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली असून रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. तर अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवला (Maldive) सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. अशातच अभिनेता नमिश तनेजा (Namish Taneja) याला कोरोनाची लागण झाली आहे. नमिशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याची माहीती त्याच्या चाहत्यांना दिली. हिंदी टेलिव्हिझन वरील लोकप्रिय अभिनेता नमिश तनेजा हा मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला असता तिथेच त्याला कोरोनाची लागण (Namish Taneja tested corona positive) झाली आहे. त्यानंतर नमिशने स्वत:ला मालदीवच्या रिसॉर्ट मध्येच कॉरन्टाइन (isolated in resort) केल आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली होती.
  त्यानंतर त्याने लाइव्ह येत चाहत्यांशी संवादही साधला.
  पोस्ट मध्ये त्याने लिहीलं आहे, ‘तुम्हा सगळ्यांना हॅलो, मी मालदीव मध्ये आहे आणि कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. मी रिसॉर्टमध्ये स्वत:ला कॉरन्टाइन केलं आहे. आणि सगळे नियम आणि सतर्कता पाळत आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका. व्हायरस खरा आहे आणि तो जगभर पसरत आहे. कृपया मास्क घाला आणि हातांना सॅनिटाइज करा, बाहेर फिरू नका. काळजी घ्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. भारतापेक्षा सुंदर कोणता देश नाही. जय हिंद.’ ‘घरात बसा सांगणारे देश सोडून पळाले’; आलिया-रणबीरवर नेटकरी संतापले नमिशने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. स्वरांगीनी (swarangini) , मै मायके चली जाउंगी तुम देखते रेहना, इक्यावन, बिग बॉस 13 (bigboss 13) , विद्या (vidya) , ऐ मेरे हमसफर (yeh mere humsafar) या मालिकांमध्ये तो झळकला होता. तर ‘कैसे मे’ या म्युझिक व्हिडिओ मध्येही ते दिसला होता.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Television

  पुढील बातम्या