मनोरंजन विश्व हादरलं! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या

मनोरंजन विश्व हादरलं! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या

समीरनं प्रसिद्ध मालिका कहानी घर घर की, क्यू की सांस भी कभी बहू थी, 'ये रिश्ते है प्यार के', 'कहानी घर घर की', 'लेफ़्ट राइट लेफ़्ट', 'इस प्यार को क्या नाम दूं' अशा मालिकांमध्ये काम केले होते.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : एकीकडे सुशांत सिंह राजपतूच्या (Sushant Singh Rajput Suicide Case) आत्महत्या प्रकरणातून मनोरंजन विश्व सावरलं नसताना आता आणखी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यानं आत्महत्या केली आहे. टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मानं (Sameer sharma) बुधवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. मालाड येथे राहत असलेल्या समीरचा मृतदेह किचनमधील सिलिंगला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरनं मालाडमधील घरं फ्रेबुवारीमध्ये भाडे तत्वावर घेतले होते. बुधवारी रात्री इमारतीच्या वॉचमननं समीरचा मृतदेह पाहिला आणि त्याच्या शेजाऱ्यांना याबाबत कळवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीरनं दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी. अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही आहे.

View this post on Instagram

Yeh Rishtey Hain Pyaar Ke actor Sameer Sharma is no more. Sameer Sharma who has featured in many shows Jyoti, Kahaani Ghar Ghar Kii, Left Right Left, Iss Pyaar Ko Kya Naam Doon – Ek Baar Phir etc was found hanging in his apartment in Malad West. As per a report in Mid-day, the night duty watchman saw the body and informed the people and the police came to the spot. The police as per reports felt that the actor committed suicide two days back. No suicide note was found in the house. Earlier, Sameer went through a major health ailment but recovered and even got back to acting. He was presently part of Yeh Rishtey Hain Pyaar Ke the Star Plus show. He played the role of Kuhu’s father in the show. A case of accidental death has been registered and the body has been sent for autopsy. #sameersharma #rip 🙏

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. समीरनं प्रसिद्ध मालिका कहानी घर घर की, क्यू की सांस भी कभी बहू थी, 'ये रिश्ते है प्यार के', 'कहानी घर घर की', 'लेफ़्ट राइट लेफ़्ट', 'इस प्यार को क्या नाम दूं' अशा मालिकांमध्ये काम केले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: August 6, 2020, 12:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading