मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss15: रोहित शेट्टीनंतर 'बिग बॉस'मध्ये सलमान खानला इम्प्रेस करणार तेजस्वी प्रकाश, पाहा VIDEO

Bigg Boss15: रोहित शेट्टीनंतर 'बिग बॉस'मध्ये सलमान खानला इम्प्रेस करणार तेजस्वी प्रकाश, पाहा VIDEO

बहुचर्चित 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) हा शो सुरु होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

बहुचर्चित 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) हा शो सुरु होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

बहुचर्चित 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) हा शो सुरु होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

  मुंबई, 30 सप्टेंबर- बहुचर्चित 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) हा शो सुरु होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. या शोसाठी कन्फर्म ५ स्पर्धकांची तर नावे समोर आली आहेत. मात्र आत्ता हळूहळू इतर स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. 'खतरों के खिलाडी'मध्ये रोहित शेट्टीचं मन जिंकल्यानंतर आता अभिनेत्री तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash) बिग बॉसमध्ये सलमान खानचं मन जिकंण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच समोर आलेला एक व्हिडीओ या गोष्टीवर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  नुकताच कलर्स टीव्हीने 'बिग बॉस'चा नवा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये काही स्पर्धक बिग बॉसच्या जंगलात एंट्री करताना दिसून येत आहेत. यावरून ३ कलाकारांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. या प्रोमोमध्ये ३ कलाकरांचे चेहरे काही प्रमाणात दिसत आहेत. त्यावरून हे ३ स्पर्धक तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा आणि गायिका अफसाना खान असल्याचं स्प्ष्ट झालं आहे. तर एका व्हिडीओवरून गायिका अकासा सिंगसुद्धा सहभागी होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे चाहत्यांची धकधक वाढली आहे. आपले लाडके आणखी कोणते कलाकार बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
  बिग बॉसच्या एका फॅन पेजवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि गायिका अकासा सिंग एन्ट्री डान्स करताना दिसून येत आहेत. एकीकडे तेजस्वी 'पाणी पाणी' या गाण्यावर डान्स करत आहे. तर दुसरीकडे अकासा सिंग 'नागीण गिन गिन...' या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवरून तेजस्वी आणि अकासा सिंग 'बिग बॉस १५' मध्ये स्पर्धक म्हणून एंट्री घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. (हे वाचा:Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली ... ) यापूर्वी तेजस्वी प्रकाश 'खतरों के खिलाडी' या स्टंट बेस रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये रोहित शेट्टी होस्टच्या भूमिकेत होता. तेजस्वीने आपल्या मजेशीर स्वभावाने रोहित शेट्टीच मन जिंकलं होतं. आत्ता 'बिग बॉस' मध्ये तेजस्वी होस्ट सलमान खानचं मन कस जिंकते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेजस्वीने हिंदी मालिकांमध्ये काम करून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या