मुंबई, 14 डिसेंबर- 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'अग्गबाई सासूबाई' ह्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejshree Pradhan) होय. तेजश्री ही मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र ती बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे. आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदची बातमी समोर आली आहे. तेजश्री लवकरच एका प्रसिद्ध मालिकेत एन्ट्री करणार आहे.
मनोरंजन मराठी या पेजवर नुकताच एक अपडेट देण्यात आली आहे. त्यानुसार अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच मराठी मालिकेत पुरागमन करत आहे. बऱ्याच दिवसांचा ब्रेक घेतल्या नंतर तेजश्री पुन्हा एकदा आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तेजश्री लवकरच 'फुलाला सुंगध मातीचा' (Phulala Sugandha Maticha) या मालिकेत झळकणार आहे. स्टार प्रवाहवर प्रक्षेपित होत असलेली ही एक प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती. मालिकेचा मोठा चाहतावर्गदेखील आहे. तसेच ही मालिका टीआरपी रेसमध्येही नेहमीच पुढे असते.
View this post on Instagram
या प्रसिद्ध मालिकेत आता लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याने मालिकेत आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळणार हे नक्की. तेजश्री या मालिकेत कोणती भूमिका साकारणार? ती निगेटिव्ह असणार कि आणखी काही हे जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. तेजश्री मालिकेत कोणता ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेजश्री प्रधान शेवटचं 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत झळकली होती. बबड्या आणि शुभ्राची ही मालिका फारच लोकप्रिय ठरली होती. मात्र त्याच्या दुसऱ्या भागात तेजश्री दिसली नव्हती.
तसेच 'बबलू बॅचलर' या सिनेमातू तेजश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. तेजश्रीने आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात लिपलॉक सीन देत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. तिचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना फारच भावला होता. त्यावेळी सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.