Home /News /entertainment /

इंटरनेटची नाही गरज; ऑफलाइन लुटा Netflix वरील फिल्म्सचा आनंद

इंटरनेटची नाही गरज; ऑफलाइन लुटा Netflix वरील फिल्म्सचा आनंद

नेटफ्लिक्स आपल्या युजर्ससाठी नेहमीच दर्जेदार कंटेन्ट पुरवण्याचा प्रयत्न करत असते. याचबरोबर आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स देखील उपलब्ध करून देत असते. त्यानंतर आता नेटफ्लिक्सने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन फिचर आणलं आहे

मुंबई 23 फेब्रुवारी :  नेटफ्लिक्स (Netflix) आपल्या युजर्ससाठी नेहमीच दर्जेदार कंटेन्ट पुरवण्याचा प्रयत्न करत असते. याचबरोबर आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स देखील उपलब्ध करून देत असते. त्यानंतर आता नेटफ्लिक्सने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन फिचर आणलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीनं युजर्सच्या आवडीचे कार्यक्रम आणि चित्रपट त्यांना आपोआप डाउनलोड करता येणार आहेत. याचबरोबर यासाठी डेटा लिमिट देखील सेट करता येणार आहे. डाउनलोड फॉर यू (Downloads for You) नावाचं हे नवीन फिचर कंपनीने आपल्या अँड्रॉइड युजर्सला उपलब्ध करून दिलं आहे. आयओएस (iOS ) युजर्ससाठी देखील लवकरच हे फिचर उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या पद्धतीनं काम करणार हे फिचर हे फिचर सुरु केल्यानंतर तुम्हाला 1GB, 3GB, आणि 5GB असे पर्याय दिसणार आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचं लिमिट सेट करायचं आहे. यानंतर तुम्ही डाउनलोड केलेला कन्टेन्ट यामध्ये सेव्ह होणार असून इंटरनेट कनेक्शन नसल्यास देखील तुम्ही हे पाहू शकणार आहात. हे फिचर कसे वापरायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे पहा : Alert!वेळीच सावध व्हा;सेटिंग्जमध्ये करा हे बदल,WhatsApp अकाउंट हॅक होण्याचा धोका या पद्धतीने करा वापर  1)सर्वात आधी Downloads या टॅबवर क्लिक करून Downloads For You या पर्यायावर क्लिक करावं लागेल. 2)यानंतर यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला किती डेटा डाउनलोड करायचा आहे यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर टर्न ऑन या बटनावर क्लिक करा. 3)या नवीन फीचरमध्ये कंटेंट डाउनलोडसाठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये तुम्ही चित्रपट या पर्यायाला देखील सामील करू शकता. 4)ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपोआप कंटेन्ट डाउनलोड होणार असून युजर्सच्या आवडीनुसार यामध्ये कंटेंट टाकण्यात आला आहे. 5)सध्या हे फिचर केवळ अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार असून लवकरच iOS वर देखील येणार आहे. परंतु iOS वर हे फिचर कधी देण्यात येणार याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Entertainment, Netflix, OTT

पुढील बातम्या