VIDEO : ... आणि मराठी नाटकानं पहिल्यांदा शिट्टी ऐकली; 'काशिनाथ'चा नवा टीझर

VIDEO : ... आणि मराठी नाटकानं पहिल्यांदा शिट्टी ऐकली; 'काशिनाथ'चा नवा टीझर

या टीझरमध्ये काशिनाथ घाणेकरांची एव्हरग्रीन डायलाॅग डिलिव्हरी पाहायला मिळतेय.

  • Share this:

मुंबई, 8 आॅक्टोबर : सुबोध भावेचा 'आणि काशिनाथ घाणेकर' सिनेमा येत्या दिवाळीत रिलीज होतोय. या सिनेमाबद्दल प्रत्येकाच्याच मनात खूप उत्सुकता आहे. आता या सिनेमाचं दुसरं टीझर रिलीज झालंय.

या टीझरमध्ये काशिनाथ घाणेकरांची एव्हरग्रीन डायलाॅग डिलिव्हरी पाहायला मिळतेय. सुबोधनं त्यांची शारीरभाषा हुबेहुब वठवलीय. हा टीझर फक्त आणि फक्त सुबोध भावेला फोकस करतो. आपल्या फेसबुक पेजवर त्यानं हा टीझर पोस्ट केलाय.

काही दिवसांपूर्वी सिनेमाचं पाहिलं टीझर लाँच झालं होतं. मराठीतील दिग्गज रंगकर्मीच्या भूमिका सिनेमातून  जिवंत होणार. या टीझरमध्ये सिनेमातले इतर व्यक्तिरेखाही समोर आल्यात. मग ते भालजी पेंढारकर किंवा श्रीराम लागू असतील, प्रभाकर पणशीकर असतील सगळे जण समोर येतात.

नोव्हेंबरमध्ये 'आणि काशिनाथ घाणेकर' रिलीज होतोय. त्याचं प्रमोशनही टप्प्याटप्प्यानं सुरू होतंय. सिनेमाचे एक एक पैलू सोशल मीडियावर दिसतायत. सुबोध भावे, सुमित राघवन आणि सोनाली कुलकर्णीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सुबोध या सिनेमाबद्दल म्हणतो, 'काशिनाथ घाणेकर साकारणं सोपं नव्हतं. माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत.बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. पण इथे असं काहीच नव्हतं.' सुबोध म्हणतो, 'बघ ना, नुसत्या त्यांच्या नावावर नाटक हाऊसफुल होत होतं. मला असा अनुभव कधीच आलेला नाही.' अर्थात, सुबोध सगळं श्रेय दिग्दर्शक अभिजीत देशपांडेला देतो. त्यानं सिनेमा चांगला लिहिलाय.

आपलं आयुष्य सफल झालं असं वाटण्याच्या काही गोष्टी असतात.. त्यापैकी ही एक.. सुलोचना दीदींची भूमिका. सोनाली कुलकर्णीनं आपल्या इन्स्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकलीय. आणि सुलोचना दीदींची भूमिका सोनाली साकारतेय, हे समोर आलं.

PHOTOS : विराट- अनुष्का तर झाले व्हिगन, आता 'या' सेलेब्रिटीजचं डाएट पाहा

First published: October 8, 2018, 1:10 PM IST

ताज्या बातम्या