मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video: तारक मेहताचा दिग्दर्शक रिटा रिपोर्टरसोबत करतोय रोमँटिक डान्स

Video: तारक मेहताचा दिग्दर्शक रिटा रिपोर्टरसोबत करतोय रोमँटिक डान्स

`तारक मेहता का उल्टा चश्मा` (Tarak Mehta ka Ulta Chashma) यातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी, फॅन्सशी कनेक्ट आहेत. या कलाकारांच्या विविध पोस्टला फॅन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

`तारक मेहता का उल्टा चश्मा` (Tarak Mehta ka Ulta Chashma) यातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी, फॅन्सशी कनेक्ट आहेत. या कलाकारांच्या विविध पोस्टला फॅन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

`तारक मेहता का उल्टा चश्मा` (Tarak Mehta ka Ulta Chashma) यातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी, फॅन्सशी कनेक्ट आहेत. या कलाकारांच्या विविध पोस्टला फॅन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    मुंबई 23 ऑगस्ट : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींप्रमाणेच आपल्या फॅन्सशी कनेक्टेड राहण्यासाठी टेलिव्हिजन सिरियल्समधील (Television Serials) कलाकारदेखील सोशल मीडियावर (Social media) अॅक्टिव्ह असतात. अनेक टीव्ही कलाकार आपल्या खासगी आयुष्यातील घडामोडी या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असतात. टीव्हीवरील सर्वाधिक गाजलेली सीरियल `तारक मेहता का उल्टा चश्मा` (Tarak Mehta ka Ulta Chashma) यातील कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी, फॅन्सशी कनेक्ट आहेत. या कलाकारांच्या विविध पोस्टला फॅन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सीरियल मधील रिटा रिपोर्टर (Rita Reporter) म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहुजा (Priya Ahuja) तिच्या एका व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओ ती मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा (Malav Rajda) यांच्यासोबत डान्स करत असून हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला.

    रिटा रिपोर्टर फेम अभिनेत्री प्रिया आहुजा सध्या पॅरेंटहूड म्हणजेच पालकत्वाचा कालावधी जोरदार एन्जॉय करत आहे. यासंदर्भातील अनेक गोष्टी प्रिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर करत आहे. सध्या तिचा एक रोमॅंटिक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या ती एका विशेष व्यक्तीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. परंतु, या व्यक्तीसोबत तिचं नातं काय आहे, याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.

    हॉटेलमध्ये काम करणारी वाणी कपूर कशी झाली अक्षयची हिरोईन? कसा होता अभिनयापर्यंतचा प्रवास

    `तारक मेहता का उल्टा चश्मा` या सिरियलमध्ये अभिनेत्री प्रिया आहुजाने `कल तक` चॅनेलच्या रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. रिटा रिपोर्टर गोकुळधाम सोसायटीत राहत असते. रिटा रिपोर्टर ही भूमिका तशी छोटीशी आहे. परंतु, प्रिया आहुजाने हे पात्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने रंगवल्याने ही भूमिका खूप गाजली आहे. भूमिका लहान असल्याने तिचा सीन या मालिकेत कधीतरीच असतो. परंतु, ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती आपल्या पती आणि बाळासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तसेच नुकत्याच आई बनलेल्या महिलांना ती पालकत्वाच्या अनुषंगाने टिप्स देत असते.

    परंतु, सध्या प्रिया आहुजाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ थोडा वेगळा आहे. या व्हिडीओत ती `तारक मेहता का उल्टा चश्मा` या सिरियलचे दिग्दर्शक मालव राजदा यांच्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. हे दोघेही एका रोमॅण्टिक गाण्यावर (Romantic Song) बाल्कनीत नृत्य करताना व्हिडीओत दिसत आहेत. मालव राजदा प्रियासोबत डान्स का करत आहेत, हा प्रश्न अनेक फॅन्सला पडत आहे. परंतु, मालव राजदा आणि प्रिया आहुजा हे पती-पत्नी आहेत. ही बाब अनेकांना माहिती नाही. तसेच हे दोघे टिव्ही इंडस्ट्री आणि या सिरियलचा महत्वाचा भाग आहे.

    अभिनेत्री प्रिया आहुजाने जो रोमँटिक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात तिने हेवी व्हाईट (Heavy White) रंगाची साडी परिधान केली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना प्रियाने `तेरे यार बथरे ने मेरा तुही ऐ बस या` या बॉलिवूड चित्रपटातील एका गाण्याच्या ओळी त्याखाली लिहिल्या आहेत. मालव राजदाने साधा शर्ट आणि ट्राउझर परिधान केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सला खूप आवडला असून, या जोडीचं लोक भरभरुन कौतुक करत आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Bollywood actress, Tarak mehta ka ooltah chashmah