कवी कुमारांच्या आठवणीत टप्पूने लिहला भावनिक मेसेज

कवी कुमारांच्या आठवणीत टप्पूने लिहला भावनिक मेसेज

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील डॉ. हंसराज हाथी फेम कवी कुमार आझाद यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील डॉ. हंसराज हाथी फेम कवी कुमार आझाद यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर्वाधिक गाजलेल्या त्यांच्या मालिकेला लवकरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण टीमवर शोककळा पसरली आहे. या मालिकेतल्या सगळ्यांनी कवी कुमार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या मालिकेत सगळ्यात आवडता कलाकार टप्पू म्हणजेच भव्य गांधी यांनी कवी कुमार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला एक इमोशनल कॅप्शनही दिलं. 'i will hold on to this hug...sleep in ease.' असं कॅप्शन देत भव्यने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना वोकार्ड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण काल दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मालिकेच्या सेटवर काल एक मीटिंग होणार होती. या मालिकेतील सर्व कलाकार एखाद्या कुटुंबाप्रमाणेच राहत असल्यामुळे आपल्या जिवलग मित्राचे झालेले आकस्मित निधन सर्वांच्याच जिव्हारी लागले. म्हणूनच काल सर्वांनी मिळून मालिकेचे चित्रीकरण रद्द केले होते.

I will hold on to this hug... sleep in ease.

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97) on

हेही वाचा...

मृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी लिहिलं होतं परेश रावल यांना पत्र

'गरोदरपणात मला कवी कुमारांनी रोज गुलाबजाम खाऊ घातले' - दया बेन

photos : बिग बाॅस मराठीच्या बीबी हाॅटेलचा नजारा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 04:22 PM IST

ताज्या बातम्या