Home /News /entertainment /

मुलीने 'जेठालाल'सारखा केला मेकअप, अस्सा जमला की ओळखताही येणं झालं कठीण

मुलीने 'जेठालाल'सारखा केला मेकअप, अस्सा जमला की ओळखताही येणं झालं कठीण

गेली 14 वर्ष सब टीव्हीवर चालू असणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा आजही तेवढीच लोकप्रिय आहे. या मालिकेचा चाहतावर्ग एवढा आहे की त्याचे जुने भागही आवर्जून पाहिले जातात. दिल्लीच्या या मेकअप आर्टिस्टने केलेला हा प्रकार थक्क करणारा आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील मुख्य पात्र जेठालाल (Jethalal) आणि दयाबेनचं फॅन फॉलोईंग जगभरात आहे. जेठालालचे मालिकेच्या जुन्या भागातले विनोदी विडिओ इंस्टाग्रामवर खूप वायरल होतात. त्यावर अनेक लोक मिम्स सुद्धा बनवतात. पण फॅन्सचं प्रेम कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. एका मेकअप आर्टिस्टने स्वतःला जेठालालसारखा लुक दिला असून आता तिला ओळखणं लोकांना कठीण जातंय. इंस्टाग्रामवर कधी कोणती गोष्ट ट्रेंड होईल सांगणं अवघड आहे. इंस्टाग्राम रिल्स (Instagram Reel) आल्यानंतर तर तुमचा जगावेगळा कन्टेन्ट काही मिनिटातच वायरल होतो. सामान्य जनतेच्या प्रतिभेला एक उत्तम मंच मिळाला आहे. अशाच एका दीक्षिता जिंदल (Dikshita Jindal) नावाच्या मेकअप आर्टिस्टने आपल्या मेकअप स्किल्सने स्वतःला हुबेहूब जेठालालसारखं बनवलं आहे. दीक्षिता दिल्लीची रहिवासी असून तिच्या ट्रान्सफर्मेशन मेकअप लूक्समुळे ती लोकप्रिय आहे. कल्पनाही करू न शकणारे अजबगजब मेकअप लूक्स करून ती सर्वांना थक्क करते. यावेळी तिने प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उलटा चष्मामधील जेठालालसारखं स्वतःच्या चेहऱ्याला बनवून ट्रान्सफर्मेशन लुकचा विडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. तिचा जेठालाल लुक होतोय वायरल इंस्टाग्रामवर सध्या टिगनी हे ट्रान्सफर्मेशन चॅलेंज वायरल होतंय. या विनोदी चॅलेंजमध्ये एखाद्या व्यक्तीसारखं स्वतःला बनवणं आवश्यक आहे. याच चॅलेंजचा भाग म्हणून तिने स्वतःला जेठालालचं रूप दिलं आहे.
  या विडिओला कॅप्शन देत ती असं म्हणते, "मी ऐकलं की तुम्ही मला जेठालालच्या रूपात बघू इच्छिता, तुमची इच्छा पूर्ण केलीये. मी स्वतःला 'तारक मेहता का उलटा चष्मा' मधल्या जेठालालसारखं बनवलं आहे. आशा करते तुम्हाला आवडेल."

  प्राजक्ता माळीचा रानबाजार नंतरचा 'तो' फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ' आता हे काय...?'

   साध्या सुध्या आणि रोजच्या आयुष्यातल्या मुद्द्यांवर बेतलेल्या कथानकामुळे तब्ब्ल 14 वर्ष ही मालिका लोकप्रिय आहे. दिलीप जोशी (Dilip Joshi) निभावत असलेल्या या भूमिकेची लोकप्रियता आस्मानाला पोहोचली आहे. जेठालाल कायमचं वेगवेगळ्या संकटात सापडलेला असतो. त्याच्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणी, त्याला लाभणारी सोसायटीच्या लोकांची साथ हे सगळं पाहणं गंमतशीर असतं. दिलीप जोशी साकारत असलेलं हे पात्र अगदी आपल्यातलं आणि सामान्य माणसाचं दर्शन घडवतं.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Tarak mehta ka ooltah chashmah, Tv serial

  पुढील बातम्या