'दयाबेन'च्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीची निवड, लवकरच दिसणार नवी 'मिसेस गाढा?'

अनेक दिवसांपासून निर्माते नवीन दयाबेनच्या शोधात होते. पण आता निर्मात्यांचा हा शोध संपला असं म्हटलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 02:45 PM IST

'दयाबेन'च्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीची निवड, लवकरच दिसणार नवी 'मिसेस गाढा?'

मुंबई, २४ एप्रिल- सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकाही परतणार नसल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. यामुळेच अनेक दिवसांपासून निर्माते नवीन दयाबेनच्या शोधात होता. आता निर्मात्यांचा हा शोध संपला असं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी पापड पोल फेम अभिनेत्री अमी त्रिवेदीला या भूमिकेसाठी विचारले आहे.

अधुरी एक कहाणी- ...म्हणून प्रेम असूनही आज एकत्र नाहीत सनी देओल आणि डिंपल कपाडिया

याबद्दल अमी त्रिवेदीला विचारले असता तिने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं. तिला दयाबेनची भूमिका ऑफर झाली नसल्याचंही अमीने स्पष्ट केलं. मात्र टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सूत्रांच्या माहितीनुसार निर्मात्यांनी दिशा वकानीच्या जागी अमी त्रिवेदीला मालिकेत घेण्याचा विचार करत आहे. याबद्दल अमी म्हणाली की, ‘मला या भूमिकेबद्दल कोणीही विचारले नाही. पण माझे मित्र मला सांगतात की ही भूमिका मी केली पाहिजे. दयाबेनच्या भूमिकेत मी चांगली दिसेन. पण अजूनपर्यंत मला यासंबंधीत कोणाचाही फोन आलेला नाही. शिवाय निर्मात्यांनीही मला फोन करण्याचा प्रयत्न केलेला नाही.’

अक्षय कुमारने विचारला असा काही प्रश्न की, हसायला लागले नरेंद्र मोदी


Loading... 

View this post on Instagram
 

Trailer releasing on Friday 29th June and #BackBencher movie releasing on 20th July 😃 ભાઈઓ, બહેનો, મમ્મીઓ, પપ્પાઓ, મિત્રો, સખીઓ અને મારા વહાલા શિક્ષકો.... સીટ બેલ્ટ બાંધી લો અને થઇ જાઓ તૈયાર... નવા આકાશની ઉંચાઈઓ સર કરવા..... બેજ દિવસમાં આવી રહ્યુ છે "બેક બેંચર" ગુજરાતી ફિલ્મનું ટ્રેલર.... મોજ મજા મસ્તી ને ઘમાલ.... બેક બેંચર ફિલ્મ બેમિસાલ.... #upcomingmovie #comingsoon #trailerrelease #DharamendraGohil #AmiTrivedi #KrishChauhan #RajivMehta #OmBhatt #Gujaratimovie #drama #comedy #purplewingsproduction


A post shared by Krish Chauhan (@krish_d_chauhan) on

जर निर्मात्यांनी ही भूमिका साकारण्यासाठी फोन केला तर ही भूमिका करशील का? या प्रश्नाचं उत्तर देताना अमी म्हणाली की, ‘ही एक मोठी जबाबदारी असेल. कोणत्याही कलाकारासाठी दिशाची भूमिका करणं आव्हानात्मक असेल. मला याची पूर्ण खात्री आहे की जी अभिनेत्री ही भूमिका करेल तिला सुरुवातीचे काही दिवस अनेक दुषणं ऐकावी लागणार आहेत. कारण दिशा जवळपास १० वर्ष या मालिकेशी जोडली गेली होती. लोकांचं तिच्यावर प्रेम आहे. जोपर्यंत मला निर्मात्यांकडून कोणतीही विचारणा होत नाही तोवर याबद्दल मी अजून काही बोलू शकत नाही.’

तुमच्या घरातली भांडणं तर माझ्यामुळेच कमी होत असतील, मोदींचा अक्षयला चिमटा
 

View this post on Instagram
 

Happy bday @dilipjoshiee live long and god bless !


A post shared by Disha Vakani (@dishaavakani) on

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ते नव्या दयाबेनच्या शोधात असल्याचं सांगितलं होतं. मोदी म्हणाले होते की, ‘मला आता नवी दयाबेन शोधावी लागणार आहे. कोणीही मालिकेपेक्षा मोठा नाही. त्यामुळे आता नवीन चेहऱ्यासोबत मालिका पुढे जाणार आहे. कारण दयाबेनशिवाय मालिकेचं कुटुंब अधुरं आहे. आम्ही दिशाला सुट्टी दिली पण तिची कायमस्वरुपी वाट पाहत बसू शकत नाही.’

लोकसभा निवडणूक 2019- उर्मिला मातोंडकरच्या मदतीला धावून आली शबाना आझमी, असा केला प्रचार

VIDEO: ...तेव्हा आंबा विकत घेण्याचीही ऐपत नव्हती - पंतप्रधान मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 01:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...