Home /News /entertainment /

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील नट्टू काकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील नट्टू काकांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

घनश्याम नायक गेल्या 10 वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका निभावत आहेत.

    मुंबई, 06 सप्टेंबर: प्रसिद्ध टीव्ही शो तारक मेहतामधील नट्टू काकांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नट्टू काका हे पात्र करणाऱ्या घनश्याम नायक यांना घशाचा त्रास होऊ लागला. सगळे रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या घशाची एक शस्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळात आहे. गेल्या काही दिवसांपासून घनश्याम तारक मेहता सिरीयलमध्ये दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर शूट झालेल्या एपिसोडमध्ये नट्टू काका दिसले नसल्यानं चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. सोशल मीडियावरही होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार घनश्याम यांच्या घशात गाठ तयार होत असल्याचं काही रिपोर्टमधून समोर आलं. त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला. अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. नट्टू काका लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा तारक मेहतामध्ये परतावेत यासाठी चाहत्यांसह सिरीयलमधील टीमही प्रार्थना करत आहे. हे वाचा-सुशांत ड्रग्स घ्यायचा का? NCB विचारणा रियाला हे 22 प्रश्न घनश्याम नायक गेल्या 10 वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका निभावत आहेत. सूत्रानुसार, घनश्याम नायक यांना मदत करण्यासाठी प्रॉडक्शन हाऊस आले आहे. ते लवकरच बरे होऊन सेटवर परत येतील असा विश्वासही प्रोडक्शन टीमनं व्यक्त केला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या