तारक मेहता का उल्टा चश्माची माधवी भाभीचा वॅम्प अवतार पाहिलात का?

तारक मेहता का उल्टा चश्माची माधवी भाभीचा वॅम्प अवतार पाहिलात का?

मालिकेत साधी आणि सोज्वळ गृहिणीची अर्थात माधवी भिडेची व्यक्तिरेखा साकारणारी सोनालिका जोशीने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट- तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत साधी आणि सोज्वळ गृहिणीची अर्थात माधवी भिडेची व्यक्तिरेखा साकारणारी सोनालिका जोशीने नुकतंच एक फोटोशूट केलं. या फोटोशूटचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. सध्या तिचा हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये तिने खलनायिकेचा लुक केला असून तिचे हावभावही काहीशे खलनायकीच आहेत. सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करताना सोनालिकाने लिहिले की, 'VAMPISH Looks !!!' सोनालिकाचा हा लुक साध्या, भोळ्या माधवीपेक्षा फारच वेगळा आहे. (गेली 11 वर्ष मी ही व्यक्तिरेखा साकारत आहे.) आता मी नवं काही करायला तयार झाली आहे. कलाकार नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारायला उत्सुक असतात.

फोटोमध्ये सोनालिकाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. डोक्याला लाल रंगाची टिकली लावली असून केस मोकळे सोडले आहेत. लाल रंगाची लिपस्टिक आणि हेवी ज्वेलरीमुळे सोनालिकाचा एक वेगळाच बोल्ड लुक पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये सोनालिका फार आक्रमकही दिसत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या पहिल्या दिवसापासून सोनालिका यात काम करत आहे. गेली 11 वर्ष ती माधवी भिडे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेत माधवी नेहमीच साडी नेसलेली दाखवण्यात आली आहे. तिचा हाच साधेपणा प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

 

View this post on Instagram

 

Good Night 🙂 #sonalikajoshi #like4like #cute #Actress #look #beauty #tmkoc #cool #taarakmehtakaooltahchashmah

A post shared by Sonalika Joshi (@sonalikajoshi) on

मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, सध्या शोमध्ये नवनवीन धमाके होत आहेत. असं वाटत आहे की, मालिकेत लवकरच माधवी भिडेची मुलगी अर्थात सोनू मालिकेत परतणार आहे. माधवी आणि तिचे पती आत्माराम तुकाराम भिडे आपल्या मुलीला गोकुळधाममध्ये परत आणायला उत्सुक आहेत. पण सणासुदीच्या काळात त्यांना तिकीट मिळत नाहीये. यासाठी ते जेठालालला तिकीट बुक करायला सांगतात. आता जेठालाल भिडेसाठी तिकीट बुक करतो की नाही आणि ते करताना अजून काही संकट तर येत नाही ना ते येत्या भागांमध्ये कळेल.

या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा

पुरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश- जेनेलिया देशमुख, केली 25 लाखांची मदत

मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदीत गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले....

VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 03:30 PM IST

ताज्या बातम्या