मुंबई, 02 जानेवारी: छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या घरातील व्यक्तींसारखेच वाटू लागले आहेत. अनेक कलाकारांनी ही मालिका आता सोडली असली तरी प्रेक्षक अजूनही या कलाकारांना मालिकेतील नावावरुनच ओळखतात. निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) या अभिनेत्रीचंही तसंच झालं आहे. तिला अजूनही प्रेक्षक ‘तारक मेहता’मधील सोनू (Sonu) या नावानेच ओळखतात.
निधी भानुशालीने नुकताच एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिला अशा बोल्ड आणि हॉट लूकमध्ये बघण्याची चाहत्यांना सवय नाही. त्यामुळे निधीला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. निधीच्या व्हिडीओवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. काहींनी लिहीलं आहे की, ‘भिडे मास्तरांना हिचं लोकेशन सांगा’, ‘ही नक्की टप्पूची आयडिया असेल’ तसंच ‘भिडे मास्तरांचे संस्कार कुठे गेले?’ असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. निधीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
स्विमसूटमधील निधीच्या व्हिडीओला सगळ्यांनी ट्रोल केलं असं नाही. काही नेटकऱ्यांनी या तिच्या सौंदर्यांचं आणि बोल्डनेसचं कौतुक केलं आहे. यापूर्वीही एकदा निधीने बिकीनी फोटो शेअर केले होते. त्या फोटोंनंतरही निधी अशीच ट्रोल झाली होती.
निधीचा जन्म 16 मार्च 1999 मध्ये गुजरातमध्ये झाला होता. 2012 मध्ये तिने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत एन्ट्री घेतली होती. निधीने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे. पण तारक मेहतामधील ‘सोनू’च्या भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.