Elec-widget

'गरोदरपणात मला कवी कुमारांनी रोज गुलाबजाम खाऊ घातले' - दया बेन

'गरोदरपणात मला कवी कुमारांनी रोज गुलाबजाम खाऊ घातले' - दया बेन

या मालिकेतल्या सगळ्यांनी कवी कुमार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील डॉ. हंसराज हाथी फेम कवी कुमार आझाद यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर्वाधिक गाजलेल्या त्यांच्या मालिकेला लवकरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण टीमवर शोककळा पसरली आहे. या मालिकेतल्या सगळ्यांनी कवी कुमार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या मालिकेतील दया बेन म्हणजे दिशा वकानी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली की, 'कवी कुमार गेले यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. हे एका धक्क्यापेक्षाही मोठं आहे. ते जसे टिव्हीवर होते तसेच ते प्रत्यक्षातही होते. त्यांना खायला आणि इतरांना खाऊ घालायला खूप आवडायचं. मी गरोदर असताना त्यांनी रोज माझ्यासाठी गुलाब जामुन आणले होते. त्यांचं आरोग्य चांगलं असतानाही ते आम्हाला सोडून गेले हे खूप धक्कादायक आहे.'

Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना वोकार्ड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण काल दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मालिकेच्या सेटवर काल एक मीटिंग होणार होती. या मालिकेतील सर्व कलाकार एखाद्या कुटुंबाप्रमाणेच राहत असल्यामुळे आपल्या जिवलग मित्राचे झालेले आकस्मित निधन सर्वांच्याच जिव्हारी लागले. म्हणूनच काल सर्वांनी मिळून मालिकेचे चित्रीकरण रद्द केले होते.

हेही वाचा...

Loading...

photos : बिग बाॅस मराठीच्या बीबी हाॅटेलचा नजारा

जेव्हा 18 वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या क्रिकेटरच्या प्रेमात पडली माधुरी दीक्षित

सई-प्रियाचा पावसातला फिटनेस फंडा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com