Tarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेक्षकांसाठी सरप्राइज, मालिकेत एंट्री घेणार हा दिग्गज अभिनेता
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज यावेळी मिळणार आहे. दिग्गज अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) यांची लवकरच या मालिकेत एंट्री होणार आहे.
मुंबई, 16 ऑगस्ट: गेली 12 वर्ष टीव्हीवरील सर्वात आवडता कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांना हसवत आहे. या काळामध्ये शोमध्ये बरेच बदलाव करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात दयाबेनची भूमिका निभावणारी अभिनेत्री दिशा वाकनी (Disha Vakani) देखील काही वर्षापासून या कार्यक्रमात दिसली नाही आहे. दरम्यान 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज यावेळी मिळणार आहे. एक दिग्गज अभिनेता या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. राकेश बेदी (Rakesh Bedi) यांची लवकरच या मालिकेत एंट्री होणार आहे.
राकेश बेदी या मालिकेचा भाग होणार आहेत, याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, या शोमध्ये ते तारक मेहताच्या बॉसची भूमिका निभावताना दिसणार आहेत. राकेश बेदी यांनी असे म्हटले आहे की, 'हो मी या मालिकेचे शूटिंग 14 ऑगस्ट रोजी सुरू केले होते, या मालिकेच्या सेटवर माझा पहिला दिवस होता.' त्यांनी अशी माहिती दिली की, 'हे खूप रंजक आहे की 12 वर्षांपूर्वी देखील मला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती, जेव्हा तारक मेहता का उल्टा चश्मा सुरू देखील झाले नव्हते.'
त्यांनी अशी माहिती दिली आहे की, ' मी या शोमध्ये तारक मेहता अर्थात शैलेश लोढाच्या बॉसची भूमिका करणार आहे. ही भूमिका पुस्तकात देखील आहे. ही भूमिका फार महत्वाची आहे.'
ते पुढे म्हणाले की, 'यावेळी जेव्हा मालिकेचे शूटिंग पुन्हा सुरू झाले तेव्हा मला कॉल आला. मालिकेत काही बदल करण्यात येत आहेत आणि माझ्या भूमिकेला इन्ट्रोड्यूस केले जाणार आहे. माझे कॅरेक्टर या शोचा भाग आधीपासूनच होते, केवळ कधी त्याला इन्ट्रोड्यूस केले नव्हते.'
'भाभी जी घर पर हैं' या प्रसिद्ध कॉमेडी शो मध्ये देखील राकेश बेदी काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. त्यामध्ये त्यांनी अंगुरी भाभीच्या वडिलांची भूमिका निभावली होती. त्याचप्रमाणे 'श्रीमान-श्रीमती', 'जबान संभालके' यांसारख्या कार्यक्रमातून त्यांनी विनोदाला एक वेगळा दर्जा मिळवून दिला आहे.