मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'असह्य वेदना सहन केल्या, त्यांना पाणीही पिता येत नव्हतं', नट्टू काकांच्या निधनानंतर बागाची भावुक प्रतिक्रिया

'असह्य वेदना सहन केल्या, त्यांना पाणीही पिता येत नव्हतं', नट्टू काकांच्या निधनानंतर बागाची भावुक प्रतिक्रिया

76 वर्षांच्या नट्टू काकांना कर्करोग असल्याचं निदान याच वर्षाच्या सुरुवातीला झालं होतं. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दोन-तीन महिन्यांत नायक यांना खूपच वेदना सहन कराव्या लागल्या, अशी माहिती बाघा अर्थात तन्मय वेकारिया याने दिली आहे.

76 वर्षांच्या नट्टू काकांना कर्करोग असल्याचं निदान याच वर्षाच्या सुरुवातीला झालं होतं. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दोन-तीन महिन्यांत नायक यांना खूपच वेदना सहन कराव्या लागल्या, अशी माहिती बाघा अर्थात तन्मय वेकारिया याने दिली आहे.

76 वर्षांच्या नट्टू काकांना कर्करोग असल्याचं निदान याच वर्षाच्या सुरुवातीला झालं होतं. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दोन-तीन महिन्यांत नायक यांना खूपच वेदना सहन कराव्या लागल्या, अशी माहिती बाघा अर्थात तन्मय वेकारिया याने दिली आहे.

    नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या लोकप्रिय मालिकेतली नट्टू काका (Nattu Kaka) आणि बाघा (Bagha) ही जोडी चाहत्यांच्या विशेष आवडीची होती. नट्टू काका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनःश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांचं रविवारी (3 ऑक्टोबर) कर्करोगामुळे (Cancer) निधन झालं. कर्करोगाशी दीर्घ काळ सुरू असलेला त्यांचा लढा रविवारी संपला. कार्यक्रमाचे निर्माते असितकुमार मोदी (Asitkumar Modi) यांनीही नायक यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. 76 वर्षांच्या नायक यांना कर्करोग असल्याचं निदान याच वर्षाच्या सुरुवातीला झालं होतं. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दोन-तीन महिन्यांत नायक यांना खूपच वेदना सहन कराव्या लागल्या, अशी माहिती तन्मय वेकारिया (Tanmay Vekaria) ऊर्फ बाघा याने दिली आहे.

    'गेले दोन-तीन महिने त्यांना खूपच वेदना सहन कराव्या लागल्या. मला असं वाटतं, की ते आता खूप चांगल्या ठिकाणी असतील. मी त्यांच्या मुलाशी बऱ्याचदा बोलायचो. तेव्हा तो मला सांगायचा, की ते प्रचंड वेदना सोसत आहेत. त्यामुळे त्यांचा विक्षिप्तपणाही वाढला आहे. त्यांना आवंढाही गिळता येत नाहीये, पाणी पिता येत नाही किंवा खाताही येत नाहीये, असं त्यांचा मुलगा सांगायचा. ते अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होते. त्यामुळे ते आता देवाच्या सुरक्षित हातांत पोहोचले आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,' असं तन्मय वेकारियाने इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितलं.

    'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये नट्टू काका यांच्यावर चित्रित झालेल्या बहुतांश प्रसंगांमध्ये बाघाही त्यांच्यासोबत आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर अनुभवण्यासारखी असतेच. वास्तविक ऑफ-स्क्रीन आयुष्यातही त्यांचे सूर जुळले होते, म्हणूनच त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वांना हवीहवीशी वाटायची. घनःश्याम नायक यांच्या आठवणीत तन्मय अर्थात बागा म्हणाला, 'माझ्या आयुष्यात जी काही मोजकी सच्ची माणसं मला भेटली, त्यापैकी एक म्हणजे घनःश्याम नायक होते. अशी व्यक्ती मला आयुष्यात पुन्हा कधी भेटेल असं मला वाटत नाही. ते खूप साधे होते. त्यांना कोणाबद्दलही कधीही वाईट बोलताना मी ऐकलेलं नाही.'

    Nattu Kaka Funeral: मेरी पगार कब बढाओगे...पगारवाढ न घेताच नट्टू काकांचा अखेरचा निरोप; जेठालाल, बबिता, टप्पूसह संपूर्ण टीम भावुक

    घनःश्याम नायक प्रामुख्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'साठीच ओळखले जात असले, तरी त्यांनी सुमारे 100 हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी काम केलेल्या टीव्ही सीरियल्सची संख्याही 300 हून अधिक आहे. एवढंच नव्हे, तर गुजराती रंगभूमीवरचं (Gujarati Theatre) त्यांचं योगदानही मोलाचं मानलं जातं.

    याच वर्षी त्यांची केमोथेरपी सुरू असतानाही त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या विशेष भागाच्या चित्रिकरणात सहभाग घेतला होता. घनःश्याम नायक यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Tarak mehta ka ooltah chashmah