Home /News /entertainment /

Big Boss15 : भिडेंची सोनू दिसणार बिग बॉसच्या घरात; तारक मेहतानंतर नव्या शोसाठी सज्ज

Big Boss15 : भिडेंची सोनू दिसणार बिग बॉसच्या घरात; तारक मेहतानंतर नव्या शोसाठी सज्ज

तारक मेहतानंतर निधी फारच चर्चेत होती. त्यामुळे निधी आता बिग बॉसमध्येही दिसणार का याची प्रेक्षकांना आतुरता आहे.

  मुंबई 31 जुलै : छोट्या पडद्याचा सर्वात जास्त चर्चेत राहणार तसेच विवादीत शो बिग बॉसचं (Big Boss) नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या पर्वात अनेक बदल दिसून येत आहेत. केवळ टीव्हीच नाही तर ओटीटीवरही शो दिसणार आहे. याशिवाय सलमानसोबतच (Salman Khan) करण जोहरही (Karan Johar) शो होस्ट करताना दिसणार आहे. करण ओटीटी स्पेसवर (Big boss on OTT) शो होस्ट करणार आहे. तर अद्याप सर्व स्पर्धकांची नावं समोर आलेली नाहीत. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सोनू भिडे म्हणजेच अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) बिग बॉसमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही वृत्तांनुसार बिग बॉसच्या निर्मात्यांनी निधीशी यासंदर्भात संपर्क साधला असून ‘बिग बॉस 15’ (Big Boss 15) साठी तिच्याशी चर्चा सुरू आहे. दरम्यान अद्याप निधी किंवा बिग बॉस कडून यावर कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही. तारक मेहतानंतर निधी फारच चर्चेत होती. त्यामुळे निधी आता बिग बॉसमध्येही दिसणार का याची प्रेक्षकांना आतुरता आहे.
  निधी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग देखील आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे एका जंगलातील तलावात पोहोण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. तारक मेहता मालिकेत तिने एक बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान 2019 मध्ये तिने हा शो सोडला. उच्च शिक्षणासाठी तिने शो सोडला असल्याचं सांगण्यात आलं होतं. सध्या अभिनेत्री पलक सिधवानी हे पात्र साकारत आहे. याआधी अभिनेत्री झील हे पात्र साकारत होती. ‘बिग बॉस 15’ साठी अनेक कलाकारांची नावं समोर येत आहेत. काहींच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याचंही संगण्यात येत आहे. याशिवाय यावेळी बिग बॉसला ग्लॅमरचा तडका मिळणार असल्याचंही समोर आलं होतं. काही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Big boss, Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv shows

  पुढील बातम्या