• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • OMG! ना जिम ना योग जेठालालनं घटवलं 10 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं सिक्रेट

OMG! ना जिम ना योग जेठालालनं घटवलं 10 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं सिक्रेट

सध्या दिलीप जोशी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. असं म्हटलं जात आहे कि त्यांनी 10 किलो वजन कमी केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर- 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehata Ka ulta Chashma) मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. या मालिकेने जवजवळ 12-13 वर्ष झालं लोकांना खिळवून ठेवलं आहे. मालिकेतील जेठालालची(Jethalal) तर गोष्टच वेगळी असते. त्याच्या विनोदाने लोक हसून लोटपोट होतात. जेठालाल ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता दिलीप जोशी(Dilip Joshi) यांनी. सध्या दिलीप जोशी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. असं म्हटलं जात आहे कि त्यांनी 10 किलो वजन कमी केलं आहे.
  काही मालिका अशा असतात. ज्या प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांच मनोरंजन करतात. अशीच एक विनोदी मालिका म्हणजे 'तर्क मेहता का उल्टा चश्मा' ही होय. या मालिकेने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र सर्वात जास्त प्रेम दया आणि जेठालाल या दोन पात्रांना मिळत असतं. जेठालालची भूमिका साकारली आहे अभिनेता दिलीप जोशी यांनी. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार दिलीप जोशी यांनी तब्बल 1o किलो वजन कमी केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्यासाठी त्यांनी कोणताही योग क्लास किंवा जिमची मदत घेतलेली नाही. (हे वाचा:VIDEO:भारतीने घटवलं 15 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं आपलं डाएट प्लॅन  ) झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप जोशी यांनी कोणत्याही एक्सरसाइजशिवाय 10 किलो वजन कमी केलं आहे. याबद्दल बोलताना दिलीप जोशी यांनी म्हटलं आहे, 'मध्यंतरी माझं वजन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्यामुळे मला अनेक शारीरिक त्रासाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मी वजन कमी करण्याचा निश्चय केला होता. तसेच एक अभिनेता असल्यामुळे, आमच्या शूटिंगच्या वेळा फिक्स नसतात. त्यामुळे इतक्या बिझी शेड्युलमधून मला जिम आणि इतर गोष्टींसाठी वेळ मिळणं फार कठीण होतं'. (हे वाचा:KBCच्या मंचावर नीरज- श्रीजेश बिग बींना शिकवणार हरियाणवी; बच्चन म्हणाले,'अरे देवा) ते पुढे म्हणाले, 'त्यामुळे मी दुसरा पर्याय अवलंबला. मी माझ्या आहारात बदल केला. मी एकदम कडक डाएट फॉलो केला आहे. त्यामुळे माझं वजन कमी होण्यास मदत होत आहे. सांगायचं झालं तर जेठालाल अर्थातच दिलीप जोशी हेसुद्धा गुजराती आहेत. त्यामुळे ते अस्सल शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांचं वजन झटपट आटोक्यात आलं आहे. जेठालालमध्ये झालेला हा बदल पाहून चाहते खूपच खुश आहेत. (हे वाचा:KBC : 'कधीच विसरू शकत नाही पहिलं प्रेम'; पुण्याच्या दीप्तीसमोर BIG B झाले व्यक्त) सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत जेठालालची पत्नी म्हणजेच दया दिसून येत नाही. दया फेम दिशा वकानीने आपल्या प्रेग्नेंसीमुळे या मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र त्यांनतर शूटिंगची वेळ आणि मिळणारं मानधन यावरून शोमेकर्स आणि दिशामध्ये एकमत नाही झालं. त्यामुळे दिशा अजूनही मालिकेत परत आलेली नाही. चाहते मालिकेत दया आणि जेठालालची जोडी पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: