मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Taarak Mehta..' फेम जेठालाल लवकरच बनणार सासरे; लग्नात दयाबेनची नसणार उपस्थिती

'Taarak Mehta..' फेम जेठालाल लवकरच बनणार सासरे; लग्नात दयाबेनची नसणार उपस्थिती

 'तारक मेहता का उल्टा चश्मा'    (Tarak Mehata Ka Ooltah Chshmah)  हा एक असा टीव्ही शो आहे जो गेल्या 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शो ने त्याची स्टारकास्ट जगभरात प्रसिद्ध केली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 डिसेंबर-   'तारक मेहता का उल्टा चश्मा'    (Taarak Mehata Ka Ooltah Chshmah)  हा एक असा टीव्ही शो आहे जो गेल्या 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोने त्याची स्टारकास्ट जगभरात प्रसिद्ध केली आहे. 'जेठालाल'  (Jethalal)  लोकांना जितकं आवडतात, तितकेच 'पोपटलाल', 'चंपक लाल', 'तारक मेहता', 'गोगी', 'टप्पू' या शोच्या इतर कलाकारही प्रेक्षकांना आवडतात. तुम्हीही हा शो पाहत असाल आणि शोसोबतच कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबाबत अपडेट राहू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दिलीप जोशींच्या घरी शुभकार्य होत आहे. जेठालाल फेम अभिनेते दिलीप जोशी   (Dilip Joshi)   लवकरच सासरे बनणार आहेत.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्यात दिलीप जोशी आपल्या मुळीच म्हणजेच नियती जोशीचं लग्न करणार आहेत. कोइमोईने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप जोशी 11 डिसेंबर रोजी आपल्या मुलीचे लग्न करून सासरे होणार आहेत. जेठालाल यांचा भावी जावई एक एनआरआय आहे.

रिपोर्टनुसार, दिलीप जोशी यांची मुलगी नियती हिचे लग्न बॉलिवूडच्या एका मोठ्या लग्नापेक्षा कमी असणार नाही. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये लग्नाची सर्व तयारी सुरू आहे. जेठालाल स्वतः आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. लग्नासाठी तारक मेहता का उल्टा चष्माच्या संपूर्ण टीमसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टार्सना आमंत्रित करण्यात आले आहे.

(हे वाचा:PHOTOS: अंकिता-विकीची लगीनघाई! लग्नाआधीच्या विधींना झाली सुरुवात)

दयाबेन नसणार उपस्थित-

जेठालालने दयाबेनला अर्थात अभिनेत्री दिशा वकानीलाही लग्नाचे आमंत्रण दिले आहे. मात्र ती या लग्नाला येणार नसल्याचे वृत्त आहे. त्यांनी दिलीप जोशी यांचे आमंत्रण स्वीकारले. परंतु त्यांनी नम्रपणे लग्नाला उपस्थित राहण्यास नकार दिला. तथापि, त्यांनी मुलगी नियतीला खूप प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत. असे मानले जाते की लग्नापूर्वी ती त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटेल. उर्वरित TMKOC टीम या प्रकरणाचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे.

मात्र, आतापर्यंत दिलीप जोशी आणि दिशा वकानी यांच्याकडून या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

First published:

Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah