मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तारक मेहता फेम अभिनेत्रीला दलित समाजाबद्दल वक्तव्य भोवलं, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

तारक मेहता फेम अभिनेत्रीला दलित समाजाबद्दल वक्तव्य भोवलं, अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता हिने एका व्हिडीओमध्ये दलित समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरला होता.

काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता हिने एका व्हिडीओमध्ये दलित समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरला होता.

काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता हिने एका व्हिडीओमध्ये दलित समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरला होता.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 मे: 'तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये बबितची भूमिका साकारणी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने दलित समाजाबद्दल केलेले वक्तव्य चांगलेच महागात पडले आहे. अंबोली पोलीस स्टेशनमध्ये (Amboli Police) तिच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा (atrocity act) गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता हिने एका व्हिडीओमध्ये दलित समाजाबद्दल जातिवाचक शब्द वापरला होता. त्यामुळे दलित समाजाने याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी आता अंबोली पोलीस स्टेशनमध्ये मुनमुन दत्ताच्या विरोधात

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम (अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट) 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनमुन दत्ता हिने 10 मे रोजी हा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. यावेळी  'क्‍योंकि मैं यूट्यूब में आने वाली हूं और मैं अच्‍छा द‍िखना चाहती हूं, '....' की तरह नहीं द‍िखना चाहती.' असं सांगत असताना तिने वाल्मिकी समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. याबद्दल अंबोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, आता गुन्हा दाखल झाला आहे.

मुनमुनने मागितली होती माफी

दरम्यान, आपली चूक लक्षात आल्यानंतर मुनमुनने माफी मागितली होती. या व्हिडीओबद्दल माफी मागताना मुनमुनने म्हटलं  होतं की, "मी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओसंदर्भात ही पोस्ट आहे. माझ्याकडून वापरल्या गेलेल्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला. हा कुणाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, कुणाला धमकी किंवा कुठल्याही पद्धतीने भावना दुखावण्याच्या उद्देशाने मी तसं बोलले नाही. माझ्या संकुचित भाषाज्ञानामुळे मला त्या शब्दाचा अर्थ नेमका माहीत नव्हता किंवा भाषेबद्दल चुकीच्या माहितीवर तसं बोललं गेलं. मला त्याचा नेमका अर्थ लक्षात आल्यानंतर मी लगेच तो भाग काढून टाकला." मुनमुनने शेअर केलेला तो VIDEO मेकअपबद्दल होता. सन्स्क्रीनशिवाय मी बाहेर पडणं का टाळते असं सांगत तिने काही ब्युटी टिप्स यात दिल्या होत्या.

First published: