मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'तारक मेहता..'फेम बबिताच्या रीलवर टप्पूची कमेंट; सोशल मीडियावर चर्चेला उधान

'तारक मेहता..'फेम बबिताच्या रीलवर टप्पूची कमेंट; सोशल मीडियावर चर्चेला उधान

राज अनादकत हा 2017 पासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सीरियलमध्ये टप्पूची भूमिका साकारू लागला आहे.

राज अनादकत हा 2017 पासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सीरियलमध्ये टप्पूची भूमिका साकारू लागला आहे.

राज अनादकत हा 2017 पासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सीरियलमध्ये टप्पूची भूमिका साकारू लागला आहे.

  मुंबई, 10 जुलै- सोनी SAB चॅनेलवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ (TMKOC) ही विनोदी मालिका गेली अनेक वर्षं लोकप्रिय आहे. त्यातल्या सर्व कलाकारांचे नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना मनापासून हसायला भाग पाडतात. त्याच सीरियलमधील बबिताजी हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Datta) हिने इंस्टाग्रामवर (Instagram) नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर त्याच सीरियलमधील टप्पूने म्हणजेच राज अनादकतने (Raj Anadkat) कमेंट केली आहे. ती कमेंट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

  View this post on Instagram

  A post shared by ‍♀️ (@mmoonstar)

  बबिताजींची भूमिका निभावणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे ती कायम व्हिडिओ, फोटो किंवा अन्य पोस्ट शेअर करताना दिसते. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सही करताना दिसतात. तिने इंस्टाग्रामवर एक रील (Reel) शेअर केला आहे. त्यावर टप्पूची भूमिका साकारणारा तिचा सहकलाकार राज अनादकतने एक कमेंट केली आहे. त्या कमेंटसह अतिशय आश्चर्य दर्शवणारी आणि हाय-फाय इमोजीही त्याने त्यात पोस्ट केली आहे.

  यावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या फोटोवर अशा प्रकारची कमेंट करणं शोभत नाही, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. एकाने राजच्या कमेंटवर रिप्लाय केला आहे, की “ही तुझ्या काकूच्या वयाची आहे.” दुसऱ्या एकाने विचारलंय, की “हे काय आहे?”

  (हे वाचा:माधुरीचा 'सिंघम'अवतार पाहून रोहितही अवाक्; VIDEO होतोय VIRAL)

  मुनमुन दत्ता 2008पासून सुरू झालेल्या ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या सीरियलमुळे घराघरात पोहचली आहे. तिचं फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटोज पोस्ट करताना दिसते. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या सीरियलच्या आधी तिने 2004 साली आलेल्या ‘हम सब बाराती’ या सीरियलमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. कमल हसनच्या ‘मुंबई एक्सप्रेस’ (Mumbai Express) या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ती इतर गोष्टींमुळेही चर्चेत असते. तिच्याविरुद्ध हरियाणातील हिस्सार, हांसी या शहरांसह वेगवेगळ्या राज्यांमध्ये एससी आणि एसटी (SC ST Act) ॲक्टनुसार एफआयआर दाखल झाले आहेत.

  (हे वाचा:बहुचर्चित ‘ब्लॅक विडो प्रदर्शित; पण भारतीयांना अजूनही करावी लागणार प्रतीक्षा  )

  राज अनादकत हा 2017 पासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सीरियलमध्ये टप्पूची भूमिका साकारू लागला आहे. त्याच्या आधी टप्पूची भूमिका भाव्या गांधी साकारत होता. राज या भूमिकेमुळे कमी कालावधीत लोकप्रिय झाला आहे.

  First published:

  Tags: Tarak mehta ka ooltah chashmah