• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • नट्टू काका ‘तारक मेहता..’मध्ये कधी परतणार? देतायेत कॅन्सरशी झुंज

नट्टू काका ‘तारक मेहता..’मध्ये कधी परतणार? देतायेत कॅन्सरशी झुंज

अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) मागील काही महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीत. तर ते काही महिन्यांपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत.

 • Share this:
  मुंबई 24 जून: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Oooltah Chashmah) गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र हे विशेष लोकप्रिय ठरलं आहे. जेठालालच्या (Jethalal) दुकानात काम करणारे नट्टू काका (Nattu Kaka) म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) मागील काही महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीत. तर ते काही महिन्यांपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. घनश्याम यांना मागील वर्षी कॅन्सर असल्याचं समजलं होतं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनीचं म्हटलं आहे. त्यांच्यावर किमोथेरपी केल्या जात आहेत. दैनिक भास्कर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा मुलगा विकास याने म्हटलं आहे की, “आता त्यांचा इलाज सुरू आहे. तर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचं गळ्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. ज्यातून त्यांच्या 8 गाठी काढण्यात आल्या होत्या.”
  पुढे त्याने सांगतिलं की, “यानंतर पुन्हा एकदा जेव्हा एप्रिल महिन्यात पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग करण्यात आलं तेव्हा घनश्याम यांच्या गळयात काही स्पॉट दिसून आले. स्पॉट दिसून आले तेव्हा त्यांना कोणत्याही वेदना जाणवल्या नव्हत्या. पण त्यांची किमोथेरपी सुरूचं होती. त्यांची तब्येत सुधारत आहे.”

  ‘तोंडाला निळा रंग का फासते आहेस?’ कंगनाचे व्हायरल फोटो पाहून चाहते पडले बुचकळ्यात

  घनश्याम यांनी म्हटलं आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चं मुंबईत चित्रिकरण सुरू झालं की ते काम सुरू करणार आहेत. पुढील महिन्यात त्यांची पुन्हा एकदा पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी टेस्ट केली जाईल त्यानंतर त्यांच्या गळ्यात आणखी स्पॉट आहेत की नाही ते समजेल. असही त्यांच्या मुलाने विकासने सांगितलं. काही दिवसांपूर्वी घनश्याम यांच्या आर्थिक अडचणींची अफवा उठली होती. ज्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर घनश्याम यांनी म्हटलं होतं की, माहित नाही लोक अशा खोट्या अफवा का पसरवतात. याशिवाय मालिकेचे निर्माचे आपली पूर्ण काळजी घेत असल्याचही त्यांनी सांगतिलं होतं.
  Published by:News Digital
  First published: