'तारक मेहता का उल्टा चश्मा' पाहून खूश झाला ICU तला पेशंट, PHOTO व्हायरल

'तारक मेहता का उल्टा चश्मा' पाहून खूश झाला ICU तला पेशंट, PHOTO व्हायरल

आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं.

  • Share this:

मुंबई, 13 मे : कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रातही मालिका, चित्रपटांचे शूटिंग बंद आहे. याकाळात जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यात येत आहेत. यात आता एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा पाहून आयसीयूमध्ये उपचार घेत असलेला रुग्ण हसायला लागला.

तारक मेहता का उल्टा चश्मा या हिंदी मालिकेचा फॅन असलेली व्यक्ती ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात होती. त्यांनी मुलाला आयसीयूमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा लावण्यास सांगितलं.  टीव्ही लावल्यानंतर वडिल मालिका पाहत असतानाचा फोटो मुलाने टिपला.

मुलाने पोस्टमध्ये म्हटलं की, जेठालाल आणि दया बेन स्क्रीनवर दिसताच वडिल हसत आहेत. वडिल ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने त्रस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये असून त्यांनी पहिल्यांदा एक मागणी केली की वॉर्डमध्ये शिफ्ट झाल्यानंतर आधी तारक मेहता का उल्टा चश्मा लाव. ते शिफ्ट झाले तेव्हा तारक मेहता का उल्टा चश्मा लावताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं.

हे वाचा : गेल्या आठवड्यात मुंबईत असणारी सनी अचानक परदेशात, म्हणाली सिक्रेट ठिकाणी सुरक्षित

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर याची माहिती निर्मात्यापर्यंत पोहोचली. प्रोड्युसर असित कुमार मोदी यांनीही या फॅनच्या प्रेमासाठी आभार मानले आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे. सध्या शोचे शूटिंग बंद आहे. लॉकडाऊनच्या काळात हे कलाकार सोशल मीडियावरून फॅन्ससोबत संवाद साधतात.

हे वाचा : राणा दग्गुबती लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

First published: May 13, 2020, 11:00 PM IST

ताज्या बातम्या