मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एकेकाळी जेठालालला केवळ 50 रुपये मिळायचे, मुलाखतीत सांगितली संघर्षाची कथा

एकेकाळी जेठालालला केवळ 50 रुपये मिळायचे, मुलाखतीत सांगितली संघर्षाची कथा

दिलीप जोशींनी (Dilip Joshi) सलमान खानबरोबर (Salman Khan) काम केलं आहे. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने (Tarak Mehata ka Ulta chashma) त्यांना वेगळी ओळख दिली.

दिलीप जोशींनी (Dilip Joshi) सलमान खानबरोबर (Salman Khan) काम केलं आहे. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने (Tarak Mehata ka Ulta chashma) त्यांना वेगळी ओळख दिली.

दिलीप जोशींनी (Dilip Joshi) सलमान खानबरोबर (Salman Khan) काम केलं आहे. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने (Tarak Mehata ka Ulta chashma) त्यांना वेगळी ओळख दिली.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ultah Chashma) या मालिकेतून घराघरात पोहचलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जेठालालच्या (Jethalal) चाहत्यांची संख्या अफाट आहे. त्यांनी मालिकांमधून किंवा चित्रपटांमधून (Film) साकारलेल्या भूमिका नेहमीच लक्षात राहतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) नेहमीच चर्चेत राहिले. दिलीप जोशी सुरुवातीपासूनच या मालिकेत काम करत आहेत.

दिलीप यांनी सलमान खानसोबतही (Salman Khan) काम केलं आहे. पण त्याला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'नेच खऱ्या अर्थाने ओळख दिली. आज टीव्ही पडद्यावरील (TV serials) दुनियेत दिलीप जोशी हे एक मोठं नाव आहे. परंतु एक काळ असा होता, की त्याच्याकडे काहीच काम नव्हतं.

दिलीप जोशी यांनी वयाच्या 12 व्या वर्षीच अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर त्याने अनेक अभिनय स्पर्धांमध्ये भाग घेतला. जुहू येथील पृथ्वी थिएटरमध्ये त्यांनी अनेक नाटकं केली. बर्‍याच व्यावसायिक चित्रपटांमध्येही काम केलं. सलग एक दशक या क्षेत्रात सातत्याने काम केल्यानंतर दिलीपने हे क्षेत्र करिअर म्हणून निवडलं.

मिड डे च्या बातमीनुसार, दिलीप जोशी उर्फ जेठालालनं नुकतचं एका मुलाखतीत त्याच्या संघर्षाचा उलगडा केला आहे. त्यानं सांगितलं की, 'मी माझ्या करिअरची सुरुवात एक बॅकस्टेज कलाकार म्हणून केली. मला एकही रोल द्यायला कोणीही तयार नसायचा. मला प्रत्येक भूमिकेसाठी मला केवळ 50 रुपये मिळायचे, पण मला थिएटर करण्याची प्रचंड आवड होती.'

त्यांनी पुढे सांगितलं की,  'बॅकस्टेजची भूमिका दिली तरी मी उत्साहाने स्वीकारायचो. कारण मला थिएटर सोडायचं नव्हतं. प्रेक्षकांनी थेट समोरासमोर केलेलं कौतुक अनमोल असतं. आपल्या विनोदांवर 800 - 1000 लोकांच्या पडलेल्या टाळ्या आणि आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हासू पैशात मोजता येत नाही.'

दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. तो पहिल्यांदा सलमान खानसोबत 'मैने प्यार क्या' या चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याने रामू नावाच्या नोकराची भूमिका साकारली होती.

दिलीप जोशी यांनी काही वर्षानंतर पुन्हा सलमान खानसोबत काम केलं. हा चित्रपट  'हम आपके हैं कौन' हा होता. 1994 मध्ये आलेल्या हम आपके हैं कौन ? या चित्रपटात दिलीप जोशीने भोला प्रसादची व्यक्तिरेखा साकारली होती.

असं असलं तरी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेत जेठालालच्या भूमिकेमुळे दिलीप जोशी घराघरापर्यंत पोहचला. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली.

First published:

Tags: Tarak mehta ka ooltah chashmah, Tv