• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • कर्जात बुडाला होता'Taarak Mehta...'फेम सोढी; नाईलाजाने गाठावं लागलं मुंबई

कर्जात बुडाला होता'Taarak Mehta...'फेम सोढी; नाईलाजाने गाठावं लागलं मुंबई

‘तारक मेहता का उल्टा चश्मा' हा लोकांचा आवडता टीव्ही शो आहे. ही विनोदी मालिका गेली 13 वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे.

  • Share this:
मुंबई, 24 सप्टेंबर-  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी अशी ओळख आहे. या मालिकेत रोशनसिंग सोधी (Roshan Singh Sodhi) ही भूमिका सध्या बलविंदरसिंग सूरी (Balwinder Singh Suri) हे करीत आहेत. मात्र, पूर्वी ही भूमिका गुरुचरणसिंग (Gurucharan Singh) हे करीत होते. या भूमिकेने गुरूचरणसिंग यांना घराघरात पोहोचवले. पण तुम्हाला माहिती आहे का, गुरुचरणसिंग हे कर्जदारांना कंटाळून मुंबईला आले होते ? झी न्यूजच्या वृत्तानुसार ,  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा' हा लोकांचा आवडता टीव्ही शो आहे. ही विनोदी मालिका गेली 13 वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी असली तरी लोकांना प्रत्येक पात्र खूप आवडते. या शोच्या प्रत्येक पात्राबद्दल तुम्हाला माहिती असेल, पण तुम्हाला या शोमधील रोशनसिंग सोधीच्या वास्तविक जीवनाबद्दल माहिती आहे का? (हे वाचा:KBC 13: महिलेने बिग बीना सांगितली घरची व्यथा; पतीने पाठवली कायदेशीर नोटीस.....) ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो मध्ये पार्टीसाठी नेहमी तयार असणारा आणि पत्नीवरील प्रेम वारंवार व्यक्त करणारा रोशनसिंग सोधी यांचे खरे नाव गुरुचरण सिंग आहे. गुरुचरण सिंग यांनी आपल्या बिनधास्त वागण्याने सर्वांची मने जिंकली होती. आज गुरुचरण हे या शोचा भाग नाहीत, पण जेव्हाजेव्हा रोशनसिंग सोधीचा विषय येतो, तेव्हा गुरूचरणसिंग यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. पण आयुष्यात एवढे यश मिळवण्या अगोदर गुरुचरण सिंग खूप अडचणीत होते. त्यांना नाईलाजाने मुंबईला (Mumbai) यावं लागलं होतं. एकेकाळी रोशनसिंग सोधीची भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंग यांनी अलीकडेच त्यांच्या एका लाइव्ह व्हिडीओमध्ये सांगितले की, त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याने ते मुंबईला आले होते. सिंग यांना ज्यांनी कर्ज दिले होते, ते त्यांना पैसे मागत होते. त्यामुळे ते मुंबईला आले, आणि सहा महिन्यांच्या आत त्यांना 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये भूमिका मिळाली. (हे वाचा:The Kapil Sharma Show' विरुद्ध तक्रार दाखल; कोर्टाचा अपमान केल्याचा लागला आरोप ) गुरूचरणसिंग या शोचा अगदी सुरुवातीपासूनच एक भाग होते. 2013 मध्ये त्यांनी हा शो सोडला होता. परंतु 2014 मध्ये प्रेक्षकांनी डिमांड केल्यामुळे ते पुन्हा या शोमध्ये काम करू लागले. सहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 2020 ला या शोमध्ये काम करणे सोडले आहे. सध्या बलविंदरसिंग सुरी हे सोधीची भूमिका साकारत आहेत.या शोमध्ये काम करणारे कलाकार आणि त्यांचा दमदार अभिनय हे या मालिकेच्या लोकप्रियतेमागील एक मोठे कारण आहे. मालिकेतील एक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. दयाबेनच्या भूमिकेत दिसणारी दिशा वाकानी आजही चाहत्यांची आवडती आहे. दिशा वाकानी सध्या या मालिकेत दिसत नाहीत.
First published: