• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'तारक मेहता..'च्या चाहत्यांना मिळाली Good News; शो मेकर्सनी दिलं मोठं सरप्राईज

'तारक मेहता..'च्या चाहत्यांना मिळाली Good News; शो मेकर्सनी दिलं मोठं सरप्राईज

जर तुम्ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

 • Share this:
  मुंबई, 16ऑक्टोबर- जर तुम्ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. निर्मात्यांनी दसऱ्याला चाहत्यांना एक खास भेट दिली आहे, जे ऐकून चाहते आनंदाने नाचणार आहेत. टीआरपी यादीमध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा नेहमीच अग्रस्थानी राहतो. त्यामुळे निर्मात्यांनी चाहत्यांचा मनोरंजन डोस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजही वर्षानुवर्षे चालणाऱ्या या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सब चॅनेलवर प्रसारित होणारा 'तारक मेहता का उल्टा चश्मा'या शो ने सर्वांनाच वेड लावलं आहे. शोमधील प्रत्येक कलाकाराला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा 'आतापर्यंत आठवड्यातून 5 दिवस प्रसारित होत असे. शोचे चाहते प्रत्येक सोमवारी शोची आतुरतेने वाट पाहत असतात. आता निर्मात्यांनी ठरवलं आहे की हा शो आता आठवड्यात 5 दिवस नव्हे तर 6 दिवसांसाठी प्रसारित केला जाईल, म्हणजेच तारक मेहताच्या चाहत्यांना अधिक मनोरंजन मिळणार हे नक्की. आता गोकुळधामचे रहिवासी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा शो आता आठवड्यातून ६ दिवस अर्थातच सोमवार ते शनिवार पर्यंत सर्व नवीन भागांसह टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. सोनी सब चॅनेलने विशेष 'महासंगम शनिवार' च्या निमित्ताने ही गोड आहे. (हे वाचा:दया बेननं का सोडलं तारक मेहता का उल्टा चष्मा?; अभिनेत्रीनं सांगितलं खरं ... ) १३ वर्षे मालिका करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन- आज घराघरात लोकप्रिय असलेली 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ही विनोदी मालिका गेल्या 13 वर्षांपासून टीव्हीवर प्रसारित होत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांची ही आवडती मालिका बनली आहे. कोरोनाच्या काळात या शोचे शूटिंग काही काळ थांबवण्यात आले होते. मात्र, नंतर योग्य त्या कोरोना नियमांनुसार, खबरदारी घेत शोचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले होते. दरम्यान काही विशेष भाग गुजरातमध्ये जाऊन शूट करण्यात आलेहोते. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचं अखंडित मनोरंजन सुरु आहे. (हे वाचा:'तारक मेहता..'मध्ये एन्ट्री करणार 'जुना सोढी'; अभिनेत्याने स्वतः दिली ...) या विनोदी मालिकेतील प्रत्येक पात्र स्वतःमध्ये खास आहे. शोमध्ये, प्रत्येक धर्म आणि संस्कृतीचे लोक गोकुळधाम सोसायटीमध्ये एकत्र गुण्यागोविंदाने राहतात, जे लोकांना एकत्र राहण्याचं प्रबोधन करतात. शोमध्ये केवळ कॉमेडीच नाही तर नातेसंबंध कसे असावेत हे देखील उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहे. तसेच सध्या मालिकेमध्ये विशेष लोकप्रिय झालेली व्यक्तिरेखा दया भाभी दिसून येत नाहीय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये थोडी नाराजी आहे. प्रेक्षक दया या पात्राला प्रचंड मिस करत आहेत. अभिनेत्री दिशा वाखाणीने ही व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र तिने काही खाजगी कारणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होत. त्यांनतर ती अजूनही मालिकेत परतली नाहीय. आता ती मालिकेत परतणार की नवी दया पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: