मुंबई, 22जुलै - टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Oolta Chashma) ही विनोदी मालिका खुपचं लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला एक खास ओळख मिळाली आहे. यातीलचं एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्रिया अहुजा (Priya Ahuja) होय. मालिकेत रिटा रिपोर्टरची (Rita Reporter) भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली आहे. मात्र प्रेग्नीन्सीमुळे ती बऱ्याच दिवसांपासून ती या मालिकेपासून दूर आहे. असं असूनही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
View this post on Instagram
नुकताच प्रिया अहुजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये ती निळ्या रंगाच्या डेनिममध्ये सुंदर पोझ देताना दिसत आहे. यावेळी तिचा एक शोल्डर उघडा दिसत आहे. आणि यावेळी तिच्या ब्राची स्ट्रीपसुद्धा फ्लोंट होतं आहे. प्रियाचा हा बोल्ड अंदाज काही युजर्सनां पसंत पडलेला दिसत नाहीय. तिच्या ब्राच्या स्ट्रीपवरून काही लोक तिला ट्रोल करत आहेत. मात्र याचंवेळी पत्नीला पाठींबा देत प्रियाचा पती आणि तारक मेहताचा दिग्दर्शक राजीव मालदाने खणखणीत उत्तर देत सर्वचं ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
(हे वाचा: उमेश कामतच्या ऑफिसवर पोलिसांचा छापा; राज कुंद्रा विरोधात सापडला मोठा पुरावा)
प्रिया अहुजाने आपला हा बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो शेयर करत त्याला आकर्षक कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शन देत प्रियाने म्हटलं आहे, ‘जे आपल्या आत्म्यासाठी चांगलं आहे. ते करून टाका’. प्रियाचा हा सुंदर फोटो तिच्या पतीनेचं क्लिक केला आहे. मात्र फोटो शेयर केल्यानंतर प्रियाच्या चाहत्यांनी तिहा कौतुक केलं. मात्र काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यावेळी तिच्या बचावासाठी तिचा पती मालवसमोर आला आणि त्याने ट्रोलर्सना आपल्या भाषेत समजावलं. मालवने ट्रोलर्सनां उत्तर देत म्हटलं आहे, ‘तुमच्या आई किंवा बहिणीलासुद्धा या कमेंट करून दाखवा. आणि बघा ते काय प्रतिक्रिया देतात’.
(हे वाचा: राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का)
प्रिया गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेपासून दुर आहे. ती सध्या एका मुलाची आहे. आणि ती जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलाला देत आहे. तिने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ चे दिग्दर्शक मालव राजदासोबत लग्न केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.