मुंबई, 9ऑक्टोबर- 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehata Ka Oolta Chsham) ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. यामधील प्रत्येक कलाकाराला रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली आहे. मात्र दीर्घकाळ चालत आलेल्या बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. शोमधील अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेतून निरोप घेतला आहे. यातीलच एक नाव म्हणजे गुरुचरण सिंह(Gurucharan Singh) होय. या अभिनेत्याने मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली होती. मात्र नुकताच या अभिनेत्याने शोमध्ये आपली कधीही एंट्री होऊ शकते अशी हिंट दिली आहे.
View this post on Instagram
अभिनेता गुरुचरण सिंह यांनी 'तारक मेहता... ' मध्ये सोढी या पात्रात आपल्या अभिनयानेजीव ओतला होता. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली होती. प्रेक्षक त्यांना मोठ्या प्रमाणात पसंत करत होते. मात्र त्यांनी काही वर्षानंतर ही मालिका अचानक सोडली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तसेच चाहते नाराजही झाले होते. असं म्हटलं जात होतं की मानधनाच्या मुद्द्यावरून त्यांनी ही मालिका सोडली आहे. तसेच त्यांच्या जागी आणखी दोन कलाकारांनी ही भूमिका साकारली आहे. मात्र त्यांच्या इतकी प्रसिद्धी नाही मिळू शकली. त्यामुळे शोमध्ये त्यांना परत आणण्याचीदेखील अनेकांनी मागणी केली होती.
(हे वाचा:इंडियन आयडॉल फेम पवनदीप-अरुणिताने गुपचूप उरकलं लग्न? Wedding फोटो होतोय VIRAL)
नुकताच ET Timesला दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्याने आपलं शो सोडण्यामागील कारण स्पष्ट केलं आहे. गुरुचरण सिंह यांनी यावेळी सांगितलं, की 'आपल्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि आणखीही काही गोष्टी होत्या ज्याकडे मला लक्ष केंद्रित करायचं होतं'. म्हणून मी हा शो सोडल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र मानधनाच्या विषयावर त्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलं नाही. यावेळी त्यांना शोमध्ये परत येण्याबद्दल विचारणा केलीअसता. देवाच्या मनात असेल तर मी नक्की येईन असं उत्तर दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.