Home /News /entertainment /

'तारक मेहता..'फेम बबितानंतर 23 वर्षीय सोनूने खरेदी केलं नवं घर; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

'तारक मेहता..'फेम बबितानंतर 23 वर्षीय सोनूने खरेदी केलं नवं घर; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

'तारक मेहता...'मध्ये भिडे गुरुजीची मुलगी 'सोनू' (Sonu) म्हणजेच पलक सिंधवानी (Palak Sindhwani) हिने तिच्या स्वप्नातील घर विकत घेतले आहे.

  मुंबई, 11 नोव्हेंबर- 'तारक मेहता का उल्टा चश्मा'  (Tarak Mheta Ka Oolta Chashmah)  या प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये 'जेठालाल'ची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी नुकतीच नवीन कार घरी आणली आहे. त्याचवेळी शोमध्ये 'बबिता जी'ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता नव्या घराची मालकिन बनली आहे. आता बातमी आहे की, 'तारक मेहता...'मध्ये भिडे गुरुजीची मुलगी 'सोनू' (Sonu) म्हणजेच पलक सिंधवानी  (Palak Sindhwani)  हिनेही तिच्या स्वप्नातील घर विकत घेतले आहे. वयाच्या २३ व्या वर्षी पलकने तिचं घर विकत घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.
  सोनू अर्थातच पलक सिंधवानी रिअल लाईफमध्ये सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि तिच्या पोस्ट्सद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते.सध्या सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. आपल्या एका पोस्टमध्ये पलक सिंधवानी एका नवीन घरात दिसत आहे. फोटो शेअर करताना पलकने चाहत्यांना सांगितले आहे की, ती नवीन घरात शिफ्ट झाली आहे.
  पलक सिंधवानीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे चाहते तिचे सतत अभिनंदन करत आहेत. यासोबतच अभिनेत्रीचे काही चाहते तिला विचारत आहेत की तिने हे नवीन घर घेतले आहे का? पलकचे चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटीही तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत. या फोटोमध्ये पलक तिच्या नवीन घरात पीच रंगाच्या सूटमध्ये पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना पलकने स्वतः नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तिच्या लिव्हिंग रूमचा हा फोटो शेअर करताना पलक तिच्या घरातील आलिशान फर्निचरची झलक दाखवत आहे. पलकचे हे नवीन अपार्टमेंट आणि तिचे इंटीरियर तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. पलक सिंधवानी काही वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा'शी जोडली गेली आहे. झील मेहता आणि निधी भानुशालीनंतर ती तिसरी अभिनेत्री आहे जिने तारक मेहतामध्ये सोनूची भूमिका साकारली आहे. या आधी झील आणि निधीने ही भूमिका साकारली होती. पलकने आपल्या अभिनय कारकिर्दीला अगदी लहान वयात सुरुवात केली आणि 'तारक मेहता...'मध्ये सोनूची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली. सोनूची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. पलक सिंधवानीची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोअर्स आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah

  पुढील बातम्या