तापसी पन्नू होणार 'वकील'

तापसी पन्नू होणार 'वकील'

तापसी आपल्या कुटुंबाचीच वकील असेल आणि कुटुंबावर झालेल्या खोट्या आरोपांविरुद्ध खटला लढेल.

  • Share this:

3 जुलै: आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली तापसी पन्नू लवकरच एका नव्या सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या नव्या सिनेमात वकिलाची भूमिका साकारणार आहे.

या सिनेमाचं नाव अजूनही ठरलेलं नाही. हा सिनेमा आतंकवाद आणि इस्लामोफोबियासारखे सीरियस विषय हाताळणार आहे.या सिनेमात तापसी आपल्या कुटुंबाचीच वकील असेल आणि कुटुंबावर झालेल्या खोट्या आरोपांविरुद्ध खटला लढेल.

या सिनेमात तापसीच्या कुटुंबातसुद्धा तगडी स्टारकास्ट आहे. ऋषी कपूर आणि प्रतिक बब्बर तिचे कुटुंबीय आहेत. या सिनेमात तापसी ऋषी कपूर यांच्या सुनेच्या भूमिकेत दिसेल. तर प्रतिक बब्बर ऋषी यांच्या मुलाची भूमिका साकारेल. सिनेमाचं दिग्दर्शन अभिनय देव करणार असून ते सिनेमाच्या तयारीला लागलेत. सध्या तरी तापसी 'जुडवा 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून सिनेमाचं शूटिंग आटोपल्यानंतर ती या सिनेमाच्या तयारीला लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...