मुंबई, 06 डिसेंबर : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो असेलल्या तारक मेहता का उल्टा चश्मामधून मागच्या काही महिन्यांपासून कलाकारांची गळती सुरू आहे. दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीनंतर अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला. काही दिवसांआधीच अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याचं समोर आलं होतं अशातच आता अनेक वर्ष टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट यानं देखील मालिका सोडल्याचं समोर आलं आहे. राजनं तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला रामराम ठोकल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या अशातच मात्र राजनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
टप्पू म्हणजे अभिनेता राज अनादकट मालिका सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. अनेकदा या अफवा असल्याचं देखील सांगितलं गेलं. मात्र यावेळी या अफवा नसून टप्पू खरंच मालिका सोडत असल्याचं समोर आलं आहे. टप्पूनं सोशल मीडियावर शो सोडत असल्याचं सांगितलं आहे. टप्पूनं पोस्ट शेअर करत म्हटलंय, 'सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. सगळ्या प्रश्नांना आता पूर्णविराम मिळणारआहे. माझं अधिकृतरित्या नीला फिल्म्स आणि तारक मेहता का उल्टा चश्माबरोबर असलेलं कॉन्ट्रँक्ट आता संपलं आहे'. टप्पूच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Year Ender 2022: सोहेल खान ते ऐश्वर्या धनुष; 2022 मध्ये 'या' कलाकारांनी संपवलं त्यांचं नातं
View this post on Instagram
टप्पूनं पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, 'तारक मेहता का उल्टा चश्मानं मला खुप काही शिकवलं आहे. माझ्या करिअरमधील ही खूप सुंदर वर्ष होती. या प्रवासात माझ्याबरोबर असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. तारक मेहताची संपूर्ण टीम, माझे मित्र मैत्रीणी, कुटुंब आणि सगळ्या प्रेक्षकांचेही आभार. सगळ्यांनी मला टप्पू म्हणून खूप प्रेम दिलं. तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथवर येऊन पोहोचलो. तारक मेहताच्या संपूर्ण टीमला पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा'.
अभिनेता राजनं काही दिवसांआधी अभिनेता रणवीरबरोबर फोटो शेअर केले होते. माझं स्वप्न पूर्ण झालं असं त्यानं फोटो शेअर करत म्हटलं होतं. आता राजचं नेमकं कोणतं स्वप्न पूर्ण झालं हे काही कळू शकलेलं नाही. पण लवकरच राज नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News