निर्मात्याने 'लेडी आयुष्मान' म्हटल्यावर तापसी भडकली, दिलं हे उत्तर...

सोशल मीडियावर ट्रोलर्सना उत्तर देण्यात तापसी पन्नूचा हात कुणीही पकडू शकत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

सोशल मीडियावर ट्रोलर्सना उत्तर देण्यात तापसी पन्नूचा हात कुणीही पकडू शकत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

  • Share this:
    मुंबई, 16 फेब्रुवारी :  सोशल मीडियावर ट्रोलर्सना उत्तर देण्यात तापसी पन्नूचा हात कुणीही पकडू शकत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ला अासामच्या गुवाहाटीमध्ये में फिल्मफेअर 2020चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जोया अख्तरच्या 'गली बॉय'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाता पुरस्कार मिळाला. पुरस्कार सोहळ्यात तापसी पन्नू, रणवीर सिंह, आयुष्मान खुराना, वरुण धवन, करण जौहर, विकी कौशल यांच्यासोबतच संपूर्ण बी-टाऊन सहभागी झालं होतं. अभिनेत्री तापसी पन्नूला 'सांड की आंख' या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तिला समीक्षकांचा क्रिटीक अ‍ॅवॉर्ड फॉर बेस्ट अ‍ॅक्टर (फिमेल) पुरस्कार मिळाला आहे. यावेळी चित्रपट निर्माता तनुज गर्ग यांनी अभिनंदनाचं ट्वीट करताना तापसीला 'फिमेल आयुष्मान खुराना'ने असं संबोधलं. 'आमच्या बॉलीवूडची फिमेल आयुष्मान खुराना आणि पॉवर हाऊसला खूप साऱ्या शुभेच्छा.' असं ट्विट तनुज गर्ग यांनी केलं. त्यावर नेहमीप्रमाणेच सणसणीत रिप्लाय तापसीने दिला आहे. तापसी म्हणाली- 'त्यापेक्षा तुम्ही मला बॉलीवूडची पहिली तापसी पन्नू म्हणू शकता'. यावर तनुज यांनी सारवासारव करत पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे की-'ती तर तु आहेसच, सगळ्यात वेगळी.' दरम्यान सांड की आँख या सिनेमासाठी तापसीची कोस्टार भूमी पेडणेकरला समीक्षकांचा क्रिटीक अ‍ॅवॉर्ड फॉर बेस्ट अ‍ॅक्टर (फिमेल) पुरस्कार मिळाला आहे.
    First published: