#MeToo - नाना पाटेकर यांना क्लीनचीट मिळालीच नाही, तनुश्री दत्ताचा दावा

#MeToo - नाना पाटेकर यांना क्लीनचीट मिळालीच नाही, तनुश्री दत्ताचा दावा

मीटू चळवळीनंतर नाना पाटेकरांना बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे त्यांचीच टीम या खोट्या बातम्या पसरवत आहेत, असा आरोप तनुश्रीने तिच्या स्टेटमेन्टमध्ये केला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लिज' या सिनेमाच्या सेटवर आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत जवळीक साधायचा प्रयत्न केला होता असा आरोप केला होता. आता जवळजवळ 7 महिन्यांनंतर पोलिसांनी ठोस पुराव्या अभावी नाना पाटेकरांना क्लिनचीट दिल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, तनुश्रीने एक स्टेटमेण्ट जारी करून म्हटलं की, गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये नाना पाटेकर यांना क्लीनचीट दिल्याच्या बातम्या येत आहेत. पण यासंदर्भात मुंबई पोलिसांनी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

मीटू चळवळीनंतर नाना पाटेकरांना बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे त्यांचीच टीम या खोट्या बातम्या पसरवत आहेत, असा आरोप तनुश्रीने तिच्या स्टेटमेन्टमध्ये केला आहे. एवढं बोलून ती थांबली नाही तर नाना यांचे लोक याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शींना त्यांचं स्टेटमेण्ट देण्यापासून धमकावत आहेत. त्यामुळे साक्षीदार स्टेटमेण्ट द्यावं की नाही याचा विचार करत आहेत. दरम्यान तनुश्रीच्या आरोपांनंतर पोलिसांनी १५ प्रत्यदर्शी साक्षीदारांची चौकशी केली मात्र या चौकशीमध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात एकही पुरवा न मिळाल्यानं त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

दिशा पटानीसाठी टायगर श्रॉफनं ठेवलं 'SOTY 2'चं स्पेशल स्क्रिनिंग
 

View this post on Instagram
 

In my suite...after hair and makeup Yesterday keynote speech was so spontaneous I was amazed at myself even,I was shocked with my own ability to impress!! So took all the compliments sheepishly


A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on

नाना पाटेकरांना पोलिसांकडून क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्यांनंतर तनुश्री दत्तानं यावर आपली नाराजी व्यक्त केली. ती म्हणली, 'हे 15 साक्षीदार त्या व्यक्ती आहेत जे सर्वच्या सर्व नानांचे मित्र आहेत मग हे सर्व लोक माझ्या बाजूने का साक्ष देतील. माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही साक्षीदाराची गरज नाही. अनेकदा सत्य काय आहे हे कोर्टात सिद्ध करणं खूप कठीण होऊन बसतं. कारण आजही अनेक खोट बोलणारे लोक या जगात आहेत जे चुकीच्या लोकांची बाजू घेऊन अन्याय झालेल्या स्त्रीला खोट ठरवतात.'

Cannes 2019 : दीपिका पादुकोणची रेड कार्पेटवर धमाकेदार एंट्री, पाहा तिचा यंदाचा लुक

तनुश्री पुढे म्हणाली, 'मी नानांविरोधात आवाज उठवल्यानंतर मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंच. पण ज्या लोकांनी माझ्या बाजूने साक्ष देण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना नानांच्या माणसांकडून धमकीचे फोन आले होते. त्यामुळे ह सर्वच लोक खूप घाबरलेले होते आम्ही त्यांना समजावलं पण अशी साक्ष देणं त्यांच्यासाठी धोकादायक वाटल्यानं त्यांनी नकार दिला याउलट अनेक खोट्या लोकांनी नानांच्या बाजूने साक्ष देत मला खोट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण एवढ्याने हार मानणाऱ्यांपैकी नाही. मी लढत राहीन आणि एक दिवस नक्की जिंकेन.'

दुसऱ्या बाईकडे पाहताना अजय देवगण जेव्हा बायकोकडूनच पकडला जातो...

SPECIAL REPORT : मग, तरीही राज ठाकरेंनी ठाण्यात सभा का घेतली नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 09:21 AM IST

ताज्या बातम्या